जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
समाजात समता निर्माण करायची असेल तर जातीच्या भिंती नष्ट करणे गरजेचे आहे.समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करणे हेच खरे महामानव डॉ बाबासाहेब आंबडकरांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन प्रा. विकी घायतडक यांनी केले.
दि ६ डिसेबर रोजी ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे सिद्धार्थनगर मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केला व मनोगतही व्यक्त केले.
यावेळी बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्षा सुरेखा सदाफुले, अनिल सदाफुले, दीपक सदाफुले, अमोल सदाफुले, सुकेंद्र सदाफुले, कबीर घायतडक, स्वप्नील राणा सदाफुले, रोहित राजगुरू, विशाल अब्दुले, सचिन सदाफुले, शिवाजी गायकवाड, गितराज सदाफुले, रोहित सदाफुले, रोहन सदाफुले, प्रितम घायतडक, सुमित घायतडक, सोनू गायकवाड, प्रमोद सदाफुले, अक्षय गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले,