जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
लहान मुले म्हणजे ओली माती, जस ओल्या मातीला ओल्यापणीच आकार द्यावा लागतो, त्याच प्रमाणे लहान मुलांना लहानपणीच संस्कार द्यावे लागतात,आणि हे संस्कार ओल्या मातीत पेरण्याचा मार्ग म्हणजे…..फक्त आणि फक्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना संस्कार हे विकत मिळत नसतात ते आपल्या इतिहासात, महापुरुषांच्या चरित्रातुन, आपल्या धर्म संस्कारातून घ्यावे लागतात व ते लहान मुलांमध्ये विकसीत व्हावेत यासाठी आदरणीय श्री भिडे गुरुजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यामातून दर वर्षी गडकोट मोहीम, धर्मवीर बलिदान मास, दुर्गा दौड, किल्ले बनवा स्पर्धा या सारखे समाज उपयोगी उपक्रम होत असतात. असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले यांनी सांगितले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित किल्ले बनवा स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ ल. ना. होशिंग विद्यालयाच्या ए. पी. जे अब्दुल कलाम सभागृहात संपन्न झाला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, दादा महाडिक, रावसाहेब नेटके, रोहिणी काशिद, राऊत मॅडम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले, मयुर भोसले सर, खंडागळे नाना, उद्धव हुलगुंडे, यासह मोठ्या संख्येने पालक व किल्ले बांधणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

यावेळी बोलताना पांडूराजे भोसले म्हणाले की, प्रतीवर्षी प्रमाने या ही वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमुळे लहान मुलांमध्ये इतीहासाची आवड निर्माण होऊन मुले किल्ला बनवतात त्यमुळे ते किल्ला बनवण्यासाठी किल्ल्याविषयी पुस्तके वाचून माहीती घेतात व त्यांना हा देश व आपला धर्म टिकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज व असंख्य मावळ्यांनी निस्वार्थी फक्त आपल्यासाठी बलिदान दिलेसे आहे व त्यामुळेच आपला हा धर्म व आपला देश हिदुस्तान आज जिवंत आहे या खर्या इतीहासाची माहीती मिळते व हेच संस्कार या बाल वयामध्ये त्याच्यामध्ये होतात त्यामुळे आपण देखील या देशाचे काहीतरी देने लागतो या भावनेने हे सर्व आजचे लहान मुले हे ऊद्याचे या हिदुस्थाचे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, तहसीलदार होऊन प्रमाणीक पणे सेवा करतात या साठीच या किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
ADVERTISEMENT 

किल्ले बनवा स्पर्धेत शेकडो मुलांनी सहभाग नोंदविला होता यात पहिल्या आठ नंबर काढण्यात आले ते पुढील प्रमाणे आहेत १)ओंकार काळे – जंजिरा
२) प्राची नेटके – प्रतापगड
३)ओम टाफरे – विजयदुर्ग
४)विक्रांत वाटाडे- सिंधुदुर्ग
५)सई पठाडे – शिवपट्टण
६)पृथ्वी राळेभात-जंजिरा
७)ओम गडदे – भुईकोट
८)शिवानी कोकाटे – सुवर्णदुर्ग
तसेच सर्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देण्यात आली. यावेळी साई काळे, हिंगशे, अभिजित राळेभात, सोहम जगदाळे, अदित्य सुरवसे, समर्थ ठेंगणे, विठ्ठल वराट, बाळासाहेब काळे, श्रेयस वराट यांच्या सह अनेक स्पर्धक व पालक उपस्थित होते.
ADVERTISEMENT
9
9 यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद म्हणाले की, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांच्या समाजोपयोगी उपक्रमामुळे संस्कृती टिकून आहे.
ADVERTISEMENT

मनसे प्रमुख प्रदिप टाफरे म्हणाले की, मोबाईलचा उपयोग माहितीचा खजिना म्हणून करा गेम खेळण्यात वेळ वाया घालवू नका.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर म्हणाले की,
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत आहे. पांडूराजे यांनी कोरोना काळात सामाजिक काम करत अनेक निराधार लोकांना अन्न पुरवले तसेच दिपावलीत धार्मिक ऐतिहासिक ठिकाणी मशाली पेटवून फटाक्यांच्या आतषबाजीने दिवाळी साजरी केली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काम करत आहे. किल्ले बनवा स्पर्धा छानच उपक्रम आहे.
एपीआय राजू थोरात म्हणाले की, लाॅकडाउन मुळे मोबाइलच्या गराड्यातून बाहेर काढण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा किल्ले बनवा स्पर्धा स्तुत्य उपक्रम आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, लहान मुलांच्या चाणाक्ष बुद्धीला चालना देण्याचे काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत आहे. किल्ले बनवा स्पर्धेमुळे मुलांना इतिहासाची माहिती मिळते.

यावेळी परिसरातील मुलांना कराटे लाठी काठी शिकवणारे माऊली जमदाडे व मल्लखांब मोफत शिकवणारे नाना खंडागळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पत्रकार सुदाम वराट, धनराज पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षिसांसाठी
मोहन ढाळे सराफ, संदीप ठोंबरे ओम हॉस्पिटल तसेच पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांचे विशेष सहकार्य लाभले.




