जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा करिश्मा ग्रामपंचायत निवडणूकीत चाललेला दिसुन आला आहे. तालुक्यातील खर्डा, साकत, अरणगाव, चौंडी व तेलंगशी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध करत भाजपाला धोबीपछाड दिला आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.
खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा करिश्मा ग्रामपंचायत निवडणुकीत चालल्याचं दिसून येतंय. येथील जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपाला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय. भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. आमदार रोहित पवार यांनी येथील ग्रामपंचायती निवडणुकीकडे स्वत:हून लक्ष घातले होते. त्याचाचा हा परिणाम असल्याचं दिसून येतंय. या निवडणुकीत विजयसिंह गोलेकर यांच्या खर्डा ग्रामविकास आघाडीने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी साकत ग्रामपंचायत वर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांची दहा वर्षांपासून सत्ता होती यावेळी मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा अरूण वराट यांच्या नेतृत्वाखालील साकेश्वर परिवर्तन पॅनलकडे 7 जागा तर भगवान मुरुमकर यांच्याकडे चार जागा आहेत. कोल्हेवाडी दोन उमेदवार स्वतंत्र आहेत. संजय वराट यांचे पाच उमेदवार निवडून आले व बिनविरोध आलेले दोन त्यांच्याकडे आले असे सात सदस्य झाले आहेत.
प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपाचा पॅनल पराभूत झाला असून अक्षय शिंदे व अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. पाडळी, तेलंगशी येथेही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अरणगाव मध्ये संतोष निगुडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल बहुमताने निवडून आला पण निगुडे पराभूत झाले त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी गत झाली आहे. पिंपरखेड हसनाबाद मध्ये बापुराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला बहुमत मिळाले आहे.
Rashtra vadi puna