विजयी उमेदवारांनी मिरवणूका काढू नयेत – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
173
जामखेड प्रतिनिधी
   जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी दि. १८ रोजी सकाळी आठ वाजता होत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पॅनल प्रमुख व नेतेमंडळी यांना आवाहन केले आहे की,
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी होणाऱ्या उमेदवार किंवा पॅनलची कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चा अमल चालू आहे. त्यामुळे डी. जे. किंवा साउंड बॉक्स बँड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवारच्या गल्लीत किंवा घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे वर्तन कटाक्षाने टाळावे. जर कोणी या नियम व अटींचे उल्लंघन करील व त्यावरून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या व्यक्तीस किंवा पॅनलला  सर्वस्वी  जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात येईल.
     असा इशारा देतानाच तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात  मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही जामखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here