जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जामखेड येथिल बाह्यस्त्रोत कामगारांना दिपावली बोनस न मिळाल्यास दि १९ जानेवारी पासून महावितरण कंपनीच्या जामखेड कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा बाह्यस्त्रोत कामगारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १८ जानेवारी पर्यंत दिवाळी बोनस न मिळाल्यास दि. १९ जानेवारी रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा बाह्यस्त्रोत कामगार संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर अध्यक्ष फारूक शेख, उपाध्यक्ष संतोष आष्टेकर, सरचिटणीस बाळू बहिर, कार्याध्यक्ष नागराज मुरुमकर, संपर्क प्रमुख दादासाहेब इरकर, सुभाष साळवे, विजय जोरे, किशोर राऊत, उमेश कोरे, आसिफ पठाण, बाळासाहेब क्षिरसागर, अशोक डाडर, परशराम
लिमकर, लक्ष्मण तोरांबे, भाऊसाहेब ठाकरे, पृथ्वीराज जगदाळे, राहूल सप्रे, किशोर साळवे यांच्या सह्य़ा आहेत ह
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वारंवार कार्यकारी अभियंता यांना पत्रव्यवहार केला आहे. बोनस देण्याचा आदेश महारुद्र सिस्टीम एजन्सी यास दिलेला आसतानाही बोनस मिळाला नाही जर उद्या दि. १८ पर्यंत बोनस मिळाला नाही तर दि. १९ जानेवारी पासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
संदर्भ:- 1)बाह्यस्त्रोत कामगार यांचे पत्र दि ०५.११.२०२०
2) बाह्यस्त्रोत कामगार यांचे पर दि १२.११.२०२०
3) अज/नगर/मास/०९६७९ दि ०७.१२.२०२०
महोदय
वरील संदर्भाय विषयानुसार वारंवार पत्र व्यवहार करून सूद्धा संबधित एजन्सी महारुद्र सिस्टीम मु. पो. खांडवी
ता. जामखेड यांना जामखेड उपविभागातील बाह्यस्त्रोत
कामगार यांचे दिवाळी बोनस देण्यासाठी संदर्भ क्रमाक ३ नुसार कार्यकारी अभियंता यांनी रीतसर पत्र व्यवहार करून दिवाळी बोनस करण्याचे आदेश दिले होते व बोनस न जमा केल्यास कंपनीच्या नियामाप्रमाणेने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या तरी सर्वस्वी जबाबदारी आपली राहील हि नम विनती. अशा प्रकारे निवेदन दिले आहे.
चौकट
याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बाह्यस्त्रोत कामगारांना बोनस मिळावा म्हणुन आपण नगरच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. नगरच्या कार्यालयानेही संबंधित एजन्सीला बोनस अदा करण्यात यावा म्हणून सांगितले आहे. १८ जानेवारी पर्यंत बोनस न मिळाल्यास कामगार उपोषणास बसणार आहेत. हा पण पत्रव्यवहार नगर कार्यालयाशी झाला आहे.