जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी 82.48 टक्के चुरशीने
मतदान होऊन शांततेत पार पडले. यात आठ ग्रामपंचायतीची टक्केवारी नव्वदीपार गेल्याने चुरस अधिकच निर्माण झाली आहे. तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती. त्यामुळे तेथे कोणताही अनुचित
प्रकार घडला नाही. नायगाव व डोणगाव येथे सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाला होता परंतु ते तातडीने दुरुस्त करण्यात आले त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
दहा ग्रामपंचायती बिनविरोध
तालुक्यातील 49 ग्रामपंचायती साठी मतदान होते यातील सारोळा, आपटी, खुरदैठण, वाकी, पोतेवाडी, सोनेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सातेफळ, राजेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही ग्रामपंचायतीचे प्रभाग बिनविरोध झाले होते. 39 ग्रामपंचायतींसाठी मतदार प्रक्रिया पार पडली
तालुक्यातील 39 ग्रामपंचायतसाठी एकूण 82.48 टक्के मतदान झाले 39 ग्रामपंचायतसाठी मतदान घेण्यात आले. यासाठी 128 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आले या निवडणुकीसाठी एकूण 67 हजार 368 मतदार होते. यापैकी पुरूष मतदार 36 हजार 147 तर यातील 32221
स्त्री मतदार होते यापैकी 55564 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तिथे टक्केवारी 82.48 एवढी आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले. प्रक्रिया सकाळी साडेसात वाजता सुरू झाली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 22 टक्के मतदान झाले होते, दुपारी दिड वाजता 41.77%, साडेतीन वाजेपर्यंत 65.06 % तर पाच वाजेपर्यंत 78 टक्के सरासरी मतदान झाले होते तर साडेपाच पर्यंत 82.48 टक्के मतदान झाले.
आठ ग्रामपंचायतीची टक्केवारी नव्वदीपार
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीचे मतदार टक्केवारी नव्वदीपार झाली आहे त्या ग्रामपंचायती माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या चौंडी गावात 91.30%, खांडवी 92.26% कुसडगाव 92.14%, जायभायवाडी 90.77%, बांधखडक 90.19%, बोर्ले 92.80% गुरेवाडी 90.31% मोहरी 90.15% अशा प्रकारे आठ ग्रामपंचायतीची टक्केवारी नव्वदीपार आहे.
तालुक्यातील खर्डा येथे ६७.२४ टक्के, पिंपरखेड ८८.४८, जातेगाव ७९. ६३टक्के, घोडेगाव ८४.६२ टक्के, मोहरी ९०.१५ टक्के, बोरले ९२.८० टक्के, नायगाव ८०.७१ टक्के, साकत ८१.२० टक्के, अरणगाव ७८.२६ टक्के, डोणगाव ८२.२३,धानोरा ८९.८७, कवडगाव ८३.३१, चोंडी ९१.३०, आघी ८५.५६, पाटोदा ८२.३१, खांडवी ९२.१६, बावी ८०.५८, सावरगाव ८८.७२, पाडळी ८९.६२, मोहा ८५.२३, कुसडगाव ९२.१४, नाहुली ८९.३८, देवदेठन ७७.२४, जायभायवाडी ९०.७७, तेलंगसी ८७.६६, धामणगाव ८४.३३, बांधखडक ९०.१९, पिंपळगाव आळवा
६९.११, लोणी ८५.११, बाळगव्हाण ८३.५९, आनंदवाडी ८८.७०, नान्नज ७४.५७, चोभेवाडी ८२.५२, पिंपळगाव उंडा ८५.१९, वाघा ८९.१२, गुरेवाडी ९०.३१, जवळके ८४.६९, तरडगाव ८२.४४, दिघोळ ८४.५२ टक्के असे ३९ ग्रामपंचायतसाठी मतदान टक्केवारीत झाले. ग्रामपंचायत
निवडणुकीसाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क होते कोणीताही गैर प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा
प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.
तालुक्यातील साकत येथे ९० वर्षांच्या व्यक्तींचे तीन चाकी सायकलवर येत मतदानाचा हक्क बजावला. महिला वयोवृद्ध व्यक्ती व अपंग मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत होते.