नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुलांना ब्लँकेटचे वाटप – नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दानशूर व्यक्तीने केली ब्लँकेटची मदत

0
266
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
       श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साकत फाटा बीड रोड जामखेड याठिकाणी नवज्योत प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातील वृद्ध व मुलांना वाढत्या थंडी पासून संरक्षण करण्यासाठी ब्लँकेट देण्यात आले. मदत करत असताना दानशूर व्यक्तीने आपल्या नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर उबदार ब्लँकेटची मदत केली त्याबद्दल संस्थेच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.
       यावेळी संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मदत केल्याबद्दल विशेष आभार मानले.
      शहरातील इतर कार्यकर्त्यांनी देखील स्वतः च्या किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीच्या वाढदिवसाला, तसेच सण- उत्सवाला व इतर कार्यक्रमांना व्यर्थ खर्च टाळून अनाथ, निराधार, गोरगरीब मुलांना व वृद्धांना आपल्या घासातील घास देऊन मदत करत नवज्योत आश्रमामध्ये कार्यक्रम साजरे करण्याचे आवाहन केले.
   यावेळी नवज्योत प्रकल्पाचे व्यवस्थापक बापूसाहेब गायकवाड, नवनाथ मंडलिक, चांगदेव भांडवलकर, काशिबाई काळे, कौसाबाई पवार, बायडाबाई मंडलिक, जयहिंद भांडवलकर, आश्राबाई उबाळे तसेच प्रकल्पातील लहान मुले व वृद्ध उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here