जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर यांनी १५ व्या वित्त आयोगातुन साकत गणातील मोहा, सावरगाव, शिऊर व नाहुली येथे बसण्यासाठी बाकडे दिले उर्वरित सर्वच गावात लवकरच बाकडे बसवण्यात येतील असे डॉ भगवानराव मुरुमकर यांनी सांगितले. सर्वात आगोदर मोहा गावात बाकडे बसल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने डाॅ. मुरूमकर यांचा सत्कार करण्यात आला व आभार मानले

मोहा गावात सर्वात आगोदर बाकडे बसवल्या बद्दल डॉ मुरुमकर यांचा सत्कार करताना उपसरपंच वामन डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य भिमराव कापसे, विकास सांगळे, पंडित गायकवाड, प्रमोद रेडे, अशोक रेडे यांच्या सह हापटेवाडी, रेडेवाडी, मोहा ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बाकडे बसवण्यात आलेल्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे व इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनी मुरुमकर यांच्याकडे आमच्या गावात बाकडे बसवा अशी मागणी करण्यात येत आहे त्यामुळे संपूर्ण गटात बाकडे बसविण्यात येणार आहेत असे सांगितले
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी सांगितले की, साकत गणातील संपुर्ण गावात सुमारे तिनशे बाकडे बसवण्यात येणार आहेत तसेच नंतर खर्डा गणातील सर्व गावात बाकडे बसवण्याचा मानस बोलून दाखवला.
१९ तारखेला खासदार डॉ. सुजय विखे-पाटील व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जायभायवाडी येथे बाकड्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी दिली. सुमारे दहा लाख रुपयांची बाकडे संपुर्ण खर्डा गणात बसवली जाणार आहेत.






