जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – (सुदाम वराट)
एक पत्रकारच दुसऱ्या पत्रकाराच्या मदतीला येऊ शकतो. हे सत्य कोणीही नाकारणार नाही. जनता पत्रकारांबाबत संघटनात्मक भेद कधीच करत नाही. जनतेसाठी सर्व पत्रकार एकसारखेच असतात. त्यांच्याकडून सर्वांना सारखाच सन्मान मिळतो. पुढील काळातही पत्रकारांचा योग्य तो सन्मान व सहकार्य केले जाईल असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, जामखेड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, कार्याध्यक्ष संतोष थोरात, अनिल धोत्रे, गणेश जव्हेरी, फोटोग्राफर संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक वीर, राजू भोगील, पप्पूभाई सय्यद, संतोष गर्जे, अजय अवसरे, कैलास शर्मा, रियाज शेख, धनराज पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव ओंकार दळवी, सदस्य संजय वारभोग, प्रकाश खंडागळे, लियाकत शेख आदी मान्यवर पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व नोटपॅड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगते लियाकत शेख, मिठुलाल नवलाखा, अशोक वीर, संतोष थोरात, प्रकाश खंडागळे, दिपक देवमाने, नासिरभाई पठाण यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
जामखेड पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जामखेडच्या पदाधिकारी व सदस्यांचे सत्कार करण्याचा योग आल्याने कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाल्याचे समाधान वाटले. आजचा कार्यक्रम हा दोन्ही संघटनांच्या एकत्रीकरणाचे द्योतक ठरावे आशा शुभेच्छा देतो असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण म्हणाले की, पत्रकारांनी एकसंघ राहिल्यास पत्रकारांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे सर्वानी एकसंघ राहावे असे सांगितले.
यावेळी पोलीस नाईक अविनाश ढेरे व काॅन्टेबल आबासाहेब आव्हाड हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गर्जे, तर आभार अविनाश बोधले यांनी मानले.