जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील जमादारवाडी येथील सुपूञ योगेश महादेव गांगर्डे यांची अमेरिकेतील नामांकित “ओरॅगन स्टेट युनिव्हर्सिटी” मध्ये “जेनेटिक कोड एक्सपांशन” या विषयात संशोधनासाठी निवड झाली आहे.
डाॅ. योगेश गांगर्डे यांनी नुकतेच केमिकल बायोलाॅजी या विषयात इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँन्ड रिसर्च भोपाल (IISER Bhopal) येथून पीएचडी चे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये त्यांनी डायबिटीस या आजारात महत्वाचे असलेल्या इंसुलिन संप्रेरकाच्या उपयुक्तता वाढीवर संशोधन केले आहे. या संशोधनावर त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान लाभलेल्या सर्व शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे ते त्यांनी आभार मानले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.