जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेणे हा समाजाचा विश्वासघात आहे असे म्हणत ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभरात अंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुका भाजपा ओबीसी सेलसह भाजपाच्या सर्व आघाड्यांच्यावतीने जामखेडमध्ये निषेध अंदोलन करण्यात आले.
राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. यामुळे ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने आज बूधवारी रस्त्यावर उतरत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डाॅ. भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, उपसभापती रवी सुरवसे, सुधीर राळेभात, प्रविण चोरडीया, दत्ता राऊत, शरद कार्ले, मोहन गडदे (मामा) , गौतम कोल्हे, अभिराजे राळेभात, काशिनाथ ओमासे, मनोज (काका) कुलकर्णी, ॲड. प्रविण सानप, सोमनाथ राळेभात, बाजीराव गोपाळघरे, महेश मासाळ, लहू शिंदे, गणेश लटके, शिवकुमार डोंगरे, उमेश रोडे, रंगनाथ ठोंबरे, किशोर वाळके, एकनाथ हजारे, भारत अडसुळ, विजय कोकाटे, अर्जुन म्हेत्रे सह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.










