सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार!!! 

0
220
जामखेड न्युज – –
तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी)  तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
ते पुढे म्हणाले की, परीक्षेच्या वेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात येईल. तसेच परीक्षांसाठी दररोज ५० हजार संगणक उपलब्ध करवून देण्यात येतील. तसेच प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. तर, अभ्यासक्रम निहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल.
बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता. आज या परीक्षेसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here