Sunday, November 1, 2026
Home ताज्या बातम्या महामार्गाचे अपूर्ण काम ठरले दुकानदारांसाठी संकट! अल्पशा पावसाने दुकानात पाणी न्यायालयीन...

महामार्गाचे अपूर्ण काम ठरले दुकानदारांसाठी संकट! अल्पशा पावसाने दुकानात पाणी न्यायालयीन पेच अन् प्रशासनाच्या अनास्थेचा फटका, जामखेड-सौताडा महामार्गावरील समस्यांमुळे व्यापारी त्रस्त

0
2
महामार्गाचे अपूर्ण काम ठरले दुकानदारांसाठी संकट! अल्पशा पावसाने दुकानात पाणी  न्यायालयीन पेच अन् प्रशासनाच्या अनास्थेचा फटका, जामखेड-सौताडा महामार्गावरील समस्यांमुळे व्यापारी त्रस्त

जामखेड न्युज – – – – – 

महामार्गाचे अपूर्ण काम ठरले दुकानदारांसाठी संकट! अल्पशा पावसाने दुकानात पाणी

न्यायालयीन पेच अन् प्रशासनाच्या अनास्थेचा फटका, जामखेड-सौताडा महामार्गावरील समस्यांमुळे व्यापारी त्रस्त

शहरात झालेल्या अल्पशा पावसामुळे बीड रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरील ‘साई वडापाव’ दुकानात रस्त्यावरील पाणी शिरले. त्यामुळे दुकानातील साहित्य व फर्निचरचे नुकसान झाले असून, जामखेड-सौताडा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे.

महामार्गाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडल्याने रस्त्यावरील पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. योग्य गटारव्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरत असून, व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

न्यायालयीन पेच आणि प्रशासकीय अनास्थेमध्ये सामान्य नागरिकांनी किती दिवस भरडायचे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

महामार्गाच्या कामाबाबत तोडगा काढून पाण्याच्या निचऱ्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चौकट
अल्पशा पावसाने जर दुकानात पाणी शिरत असेल तर जास्त पाऊस झाल्यानंतर काय परिस्थिती होईल महामार्गालगतची नाली अनेक ठिकाणी बंद आहे. रस्त्यावरील पाणी नालीत जात नाही यामुळे रस्त्यावरील पाणी दुकानात जात आहे. लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!