Home शैक्षणिक बातम्या अनुष्का जैनची सुवर्णपदकांची हॅटट्रिक, सेजल तायडेचेही सुवर्ण! राष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राची...

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची हॅटट्रिक, सेजल तायडेचेही सुवर्ण! राष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राची पाच पदकांची कमाई, देशात तिसरा क्रमांक

0
3
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची हॅटट्रिक, सेजल तायडेचेही सुवर्ण!  राष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राची पाच पदकांची कमाई, देशात तिसरा क्रमांक

जामखेड न्युज – – – – – 

अनुष्का जैनची सुवर्णपदकांची हॅटट्रिक, सेजल तायडेचेही सुवर्ण!

राष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राची पाच पदकांची कमाई, देशात तिसरा क्रमांक

श्रीनगर येथे पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत राज्याचा गौरव वाढविला. अनुष्का दत्तात्रय जैन हिने सलग तिसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक हॅटट्रिक पूर्ण केली, तर सेजल संजय तायडे हिनेही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महाराष्ट्राने या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकावला.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) यांच्या वतीने १५ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्रीनगर येथे ७० वी राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकतालिकेत आपले स्थान उंचावले.
मुलींच्या ४५ किलो वजनी गटात अनुष्का दत्तात्रय जैन हिने सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, सलग तीन वर्षे सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी करत तिने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

मुलींच्या ६५ किलो वजनी गटात सेजल संजय तायडे हिने सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघींच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राला देशात तिसरे स्थान मिळविण्यात यश आले. तन्मय पाटील याने रौप्यपदक पटकावले, तर समायरा स्वामी आणि प्रज्वल ढवळे यांनी कांस्यपदके मिळविली. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या संघाने एकूण पाच पदकांची कमाई केली.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाला प्रशिक्षक सुमित खरात आणि विजया पोळ यांचे मार्गदर्शन लाभले, तर सदानंद सवळे यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.

महाराष्ट्राच्या या यशाबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला, सहसंचालक संजय सबनीस, वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंदर सिंग बाजवा, महासचिव सोहेल अहमद, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, उदय जोशी, शेखर पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार अंबादास दानवे, सचिव महेश इंदापुरे आणि महाराष्ट्रातील जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण उदमले, अविनाश पाटील, विजय खंडार, दीपक बिसेन व बंटी राठोड यांनीही पदकविजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.
अनुष्का जैनची सुवर्णपदकांची हॅटट्रिक आणि सेजल तायडेचे सुवर्णयश ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. या यशामुळे राज्यातील वुशू खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पुढील कामगिरीसाठी प्रेरणा मिळणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!