जामखेड न्युज—–
साकेश्वर यात्रेनिमित्त कुस्तीत पै. भारत मदने ठरला साकेश्वर केसरी तर बैलगाडा मध्ये संभाजीनगरचा गुरू व जालनेकर यांचा सर्जा ठरले साकेश्वर केसरी

जामखेड तालुक्यातील साकत येथील श्री साकेश्वर यात्रेनिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी कावड मिरवणूक, देवाचा अभिषेक, शेरणी वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता यात प्रथम क्रमांकाची कुस्ती करत पै. भारत मदने ठरला साकेश्वर केसरी ठरला चिराग मंगेश आजबे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवले होते. तसेच श्रीराम घोडेस्वार यांच्यातर्फे आकर्षक चषक देण्यात आला. तर बैलगाडा शर्यतीत संभाजीनगरचा गुरू व जालनेकर यांचा सर्जा ठरले साकेश्वर केसरी
ठरले यांच्या साठी अनिलजी वराट यांच्या तर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

जंगी कुस्ती हगाम्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या दोन कुस्त्या होत्या इंटरनॅशनल चँपियन पै.संजय तनपुरे यांनी पै.ऋषी काळे यांना आस्माण दाखवले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस संजय वराट व कैलास वराट यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. तसेच दुसरी द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. संदिप लटके यांनी पै. धुळाजी ईटकर वर विजय मिळवला. यांना डॉ. भगवानराव मुरूमकर व कांतीलाल वराट यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. तृतीय क्रमांक पै. सौरभ गाडे यांनी विजय मिळवला तसेच पै. देवा थापा नेपाळ विरुद्ध नवीन चव्हाण हिमाचल यांच्या कुस्ती ने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली. देवा थापा साठी रोहित घोडेस्वार व नवनाथ बहिर यांनी बक्षीस ठेवले होते.
स्पर्धेदरम्यान मैदान कुस्ती प्रेमींनी खचाखच भरले होते. उत्कृष्ट सूत्रसंचालन, दर्जेदार साऊंड सिस्टिम, दमदार हलगी वादन आणि जोशपूर्ण वातावरण यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. यावेळी परिसरातील तसेच जामखेड, पाटोदा, आष्टी, भूम, परांडा येथील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ह. भ. प. उत्तम महाराज वराट, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, मंगेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, सुरेश वराट, विनोद वराट, माजी उपसभापती कैलास वराट, ऋषीकेश पाटील, राजाभाऊ वराट, कांतीलाल वराट, सदाशिव वराट, सागर मुरूमकर, श्रीराम घोडेस्वार, नवनाथ बहिर, रोहित घोडेस्वार, शरद कार्ले, गणेश वराट, अविन लहाने, नारायण लहाने, दादासाहेब लहाने, देविदास वराट, भास्कर वराट, राजाभाऊ वराट, शहादेव वराट, विठ्ठल वराट, दादासाहेब मोहिते, आप्पासाहेब मुरूमकर, यांच्या सह अनेक कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






