सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गटनेते तात्याराम पोकळे यांच्या वतीने गरजूंना ब्लँकेट चे वाटप
सभापती प्रा राम शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक, कार्यकर्ते यांनी हार – तुरे, केक न आणता सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत जामखेड नगरपरिषदेतील गटनेते तात्याराम पोकळे यांनी गरजू, वंचित अशा पालावर राहणाऱ्या शेकडो लोकांना ब्लँकेट चे वाटप केले आहे.
तात्याराम पोकळे हे सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आपल्या शिवशांती ग्रुपच्या माध्यमातून सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. नुकतीच त्यांची भाजपाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
तात्याराम पोकळे हे शांत संयमी नेतृत्व २००९ पासून भाजपा व सभापती प्रा राम शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित आहेत. समाजकारणातही ते अग्रेसर असतात. प्रभाग नऊ मधुन 396 मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांना एकनिष्ठेचे फळ म्हणून गटनेते पदी नियुक्ती केली आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालातून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवत भाजपाने केवळ सत्ता मिळवली नसून, विरोधकांच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालावर राहणाऱ्या गोरगरीब वंचित घटकांतील कुटुंबातील शेकडो नागरीकांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले. यामुळे या नागरिकांना मायेची उब मिळणार आहे.
आपल्या शिवशांती ग्रुपच्या माध्यमातून सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालावरील नागरिकांना ब्लँकेट चे वाटप करत आदर्श सामाजिक उपक्रम राबविला आहे. याबाबत त्याचे आभार व कौतुक होत आहे.