रेव्हेन्यू सोसायटीच्या चेअरमनपदी कारंडे सुखदेव यांची बिनविरोध निवड

0
234
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट ) 
 रेव्हेन्यू अॅण्ड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हमेंट साईटस्
को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळ सदस्यांची सभा अध्यासी अधिकारी व्ही. के. मुटकुळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली घेणेत आली असता त्यामध्ये चेअरमनपदी सुखदेव कारंडे  यांची बिनविरोध निवड. करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                     ADVERTISEMENT
सुखदेव कारंडे हे तहसिल कार्यालय जामखेड येथे कार्यरत आहेत. संस्थेचे नुतन चेअरमन यांचे निवडीबद्दल मावळते चेअरमन अनिल मांढरे, तसेच व्हा.चेअरमन शंकर जगताप, माजी चेअरमन विजयकुमार धोत्रे, दिपक कारखिले, कैलास साळुके, व्हा.चेअरमन शशिकांत लहारे, श्रीमती ज्योती अकोलकर, श्रीमती कविता वाकळे, गणेश वावरे, संचालक नवनाथ दाते, शरद झावरे, सुनिल खंडागळे तसेच, जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ, महसूलचे
पदाधिकारी व माजी चेअरमन सचिन औटी, जिल्हा महसुल संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, जिल्हा तलाठी संघटनेचे पदाधिकारी शेणकर तात्या, मेजर सावंत, रावसाहेब निमसे, सुतार तात्या, दिनकर घोडके, राजाराम गायकवाड तसेच जनरल सेक्रेटरी बाबासाहेब पालवे व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here