जामखेड परिसरात बिबट्याची दहशत बावी, फक्राबाद व सावरगाव परिसरात भीतीचे वातावरण

0
1053

जामखेड न्युज——

जामखेड परिसरात बिबट्याची दहशत
बावी, फक्राबाद व सावरगाव परिसरात भीतीचे वातावरण

जामखेड तालुक्यात बावी, फक्राबाद व सावरगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे यात एक महिला जखमी तर काही बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जामखेड तालुक्यातील बावी गावच्या शिवारात 1 डिसेंबर2025 रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यामुळे उषाबाई सौदागर चव्हाण (वय 45) या महिलेवर गंभीर इजा झालीआहे. त्यांना स्थानिक जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आल्यावर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे नेण्यात आले आहे.

बावी व फक्राबाद या भागातील सावता राऊत यांच्या 3 बोकडांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वन विभागाने त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.


सावरगाव येथील पोलीस पाटील तुषार चव्हाण यांच्या वस्तीवरील शेळी लांडग्याने अथवा बिबट्याने काल रात्री नऊच्या सुमारास जागेवर फाडून घेऊन गेला आहे राहत्या घरापासून केवळ 50 ते 60 फुटावर बांधलेल्या शेळीचा कसल्याही प्रकारचा आवाज आला नाही. हनुमान वस्ती येथील आठ दिवसापासून सिंगल फेज लाईट नसल्याकारणाने अंधाराचा फायदा घेऊन लांडगा अथवा बिबट्याने शेळीची फराळ केली त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या लक्षात घेऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा तयारी करत आहे. नागरिकांमध्ये रात्री एकट्याने फिरण्याचे टाळा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

या परिसरात बिबट्याचा वावर आणि त्याचा हल्ला चिंतेचा विषय ठरत आहे. ही घटना स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीती वाढवणारी ठरली असून वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here