पैशाच्या जोरावर नाही तर कामाच्या बळावर आमचीच सत्ता येणार – महेश निमोणकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर जामखेड बनवणार

0
782

जामखेड न्युज—–

पैशाच्या जोरावर नाही तर कामाच्या बळावर आमचीच सत्ता येणार – महेश निमोणकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर जामखेड बनवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वांनाच माहिती आहे. आणि माझ्या कामाची पद्धत पाहून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद दिले आहे. अजित दादांचे जामखेड वर विशेष लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील जामखेड साठी जामखेड कर आमच्या बरोबर राहतील आणि आमचीच सत्ता येणार असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर सांगितले. 

कोरोना काळात परिसरात भयानक दुष्काळ पडलेला असताना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. यावेळी महेश निमोणकर यांनी महासंग्राम युवा मंचच्या वतीने संपूर्ण शहरासह वाडी वस्तीवर मोफत टँकर द्वारे पाणीपुरवठा करत जनतेला दिलासा देण्याचे काम केले होते. तसेच रूग्णांना दिलासा व आरोळे कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. हिच जनतेची सेवा आज महेश निमोणकर यांची ताकद बनलेली आहे.

तसेच महासंग्राम युवा मंचच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते वर्षभर ज्यांना रक्ताची गरज भासेल त्यांना ब्लड बँकेमार्फत मोफत रक्त दिले जाते. उपनगराध्यक्ष असताना शहराच्या पाणीपुरवठ्याची अडचण लक्षात घेऊन उजणी वरून पाणीपुरवठा योजना मंजुरी आणण्याचे मोठे काम त्यांच्याच काळात झाले आहे.

सध्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे तसेच विद्यमान आमदार रोहित पवार या दोन महिशक्तीसमोर जनतेच्या प्रेमाखातर मी लढत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन आपल्याला जामखेड चा विकास करावयाचा आहे. ही निवडणुक पैशाच्या जोरावर नाही तर कामाच्या जोरावर होणार आहे. यामुळे आफला विजय पक्का आहे.

जामखेड नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा महेश निमोणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. अजित पवार यांच्या स्वप्नातील जामखेड साठी जामखेड कर घड्याळाला मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून देणार असल्याचा विश्वास महेश निमोणकर यांची व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here