Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – आम आदमी...

भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – आम आदमी पार्टी

0
227

जामखेड न्युज—–

भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – आम आदमी पार्टी

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले.

भटक्या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध, लहान मुले आणि महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकारे, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका यांना भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अँटी-रेबीज इंजेक्शन आणि औषधे सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

यावेळी बोलताना असिफ शेख यांनी सांगितले,जर नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर पुढील काळात कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ही नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची राहील.

हा प्रश्न त्वरित न सुटल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडेल जाईल,असा इशारा शेख यांनी
दिला.

या प्रसंगी आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा, शहराध्यक्ष अजय भोसले, युवा नेते आसिफ शेख,ॲड.बिपीन वारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नय्युम सुभेदार,दिनेश राळेभात, प्रमोद खोटे,विजय राळेभात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!