ल.ना.होशिंग विद्यालयाच्या खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड
दि 23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र ॲथलेटिक्स लोणी येथे फेडरेशन आयोजित क्रीडास्पर्धेत ल.ना.होशिंग विद्यालयाचे विद्यार्थी जिल्ह्यातून निवडून राज्य पातळीवर निवड झाली व पुढे बालेवाडी पुणे या ठिकाणी स्पर्धा होऊन राज्य पातळीवर निवड होऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे या खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
सर्व खेळाडूंमुळे विद्यालयाच्या क्रीडा वैभवात मैदानी क्रीडा स्पर्धेतून मानाचा तुरा रोवला आहे.सर्व यशस्वी खेळाडूंचे दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड,अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे,सचिव अरुणशेठ चिंतामणी,सहसेक्रेटरी डॉक्टर सुनील कटारिया,खजिनदार शरद देशमुख सर्व संचालक प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे अठरा वर्षे वयोगट अमित जाधव भालाफेक प्रथम, फरान शेख थाळीफेक प्रथम सिद्धी रासकर थाळीफेक – प्रथम सोळा वर्षे वयोगट पायल गणेश गवळी गोळा फेक – प्रथम वीस वर्षे वयोगट अनंता अष्टेकर लांब उडी- प्रथम,उपेश धनलगडे गोळा फेक – प्रथम विशाल उगले भालाफेक – प्रथम .ऋषिकेश धनलगडे थाळीफेक- द्वितीय सर्व विद्यार्थ्यांची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या राज्यस्तरीय स्पर्धा बालेवाडी पुणे येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत विद्यालयातील कु सिद्धी अर्जुन रासकर हीने थाळी फेक मध्ये राज्यात दुसरा क्रमांक ( सिल्व्हर मेडल ) मिळवले आहे.
त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मैदानी खेळामधून मानाचा तुरा सिद्धीने रोवला आहे.तसेच तिचे पश्चिम विभागीय होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. चि. अमीत जाधव याने भाला फेक मध्ये राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे सर्व खेळाडुंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी ल. ना.होशिंग माध्य व उच्च विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पारखे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे राघवेंद्र धनलगडे,प्रल्हाद साळुंके ,डॉक्टर अण्णा मोहिते,बापू जरे,धीरज पाटील या क्रीडा शिक्षकांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.