जामखेड न्युज—-
जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना जाहीर
पहा जामखेड तालुक्यातील कोणते गाव कोणत्या गटात व गणात
जामखेड तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट तर सहा पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. यात 73 साकत, 74 खर्डा, 75 जवळा असे जिल्हा परिषद गट आहेत तर 145 शिऊर, 146 साकत, 147 दिघोळ, 148 खर्डा, 149 अरणगाव, 150 जवळा असे सहा गण तयार झाले आहेत.
आज प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की,
क्रमांक जिपपंस निवडणूक /कावि/ / २०२५ दिनांकअधिसूचना क्रमांक जिपनि २०२५/प्र.क्र.३६/पं.रा. २ दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रदानकेलेल्या अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२, पोट-कलम (१) अन्वये अहिल्यानगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा परिषद जितक्या निवडणूक विभागामध्ये विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागांचीसंख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि ते निवडणूक विभाग दर्शविणारा क्रमांकजि.प.पं.स. निवडणूक /कावि/०८/२०२५ दिनांक १४/०७/२०२५ चा आदेशाचा प्रारूप मसुदामहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चेकलम १२, पोट-कलम (१) सह शासन अधिसूचना क्रमांक जिपनि २०२५/प्र.क्र.३६/पं.रा.२दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन निम्नोक्त आदेश देत आहे.
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन१९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चे कलम ९(१) अन्वये शासन अधिसूचना क्रमांक – जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा. २ दिनांक १२ जून २०२५ च्या आदेशान्वये त्यांनी अहिल्यानगर जिल्हापरिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे;
त्याअर्थी, आता शासन अधिसूचना क्रमांक जिपनि २०२५/प्र.क्र.३६/पं.रा. २दिनांक १२ जून २०२५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदाव पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम ५) चे कलम १२ चापोट-कलम (१) खाली मी, डॉ. पंकज आशिया जिल्हाधिकारी, अहिल्यानगर याद्वारे उक्तजिल्हा परिषद क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल त्या निवडणूक विभागांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहे.3. या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हाआदेश अंमलात येईल.
पहा कोणते गाव कोणत्या गटात व गणात
गटाचे नाव ७३ साकत
गणाचे नाव १४५ शिऊर
या गणामध्ये मोहा, राजेवाडी, कुसडगाव, सरदवाडी, खांडवी, डिसलेवाडी, सारोळा, काटेवाडी, खुरदैठण, सावरगाव, धोंडपारगाव, पाडळी, झिक्री, शिऊर अशी 14 गावे शिऊर गणात आहेत.