प्राथमिक शिक्षक बँकेच्या जामखेड  शाखेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न    

0
237

जामखेड प्रतिनिधी 

             जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
      कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलली आहेत कष्ट करण्याची सवय ठेवा कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाच बळ द्या आणी आपले पुढील आयुष्य उज्वल बनवा असे आवाहन प्रा. मधुकर राळेभात यांनी  केले. जामखेड येथिल प्राथमिक शिक्षक बँकेच्या शाखेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
          जामखेड तालुक्यातील शैक्षणिक वर्ष 2020-2021मध्ये इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांचा व तालुक्यात आंतरजिल्हा बदलीने नवीन हजर झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ माजी जि.प.सदस्य श्री.मधुकर (आबा) राळेभात व जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.नागनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शिक्षक बँक शाखा जामखेड व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद,मा.रावसाहेब रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळ यांच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अहमदनगर मुख्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.लक्ष्मीकांत देशमुख हे होते.शिक्षक बँकेच्या संचालिका सौ.सिमा निकम, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राम निकम ,केंद्रप्रमुख माजीद शेख,केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते,जेष्ठ शिक्षक श्री.दिनकर सानप,डाॅ.सुधीर ढगे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
        यावेळी बोलताना प्रा. राळेभात म्हणाले की, कोणत्याही क्षेञात आपण  जिद्द व चिकाटी ठेवून प्रामाणिकपणे काम केल्यास यश हे नक्कीच मिळते,आपल्या मुलांचा आपल्या माणसांकडून झालेला सत्कार खरोखरच प्रेरणादायी असतो, प्रत्येक मनापासून केलेले काम हीच खरी देवपूजा असते असे संत तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास वेळोवेळी पूर्ण करावा असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यावर विश्वास ठेवून त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्यावे, त्यांचेवर आपल्या इच्छा लादू नका त्यांना शिक्षणासंबधी निर्णय घेऊ देण्याचे आवाहन केले.शिक्षक बँकेने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचे अभिनंदन केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे.अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते याप्रमाणेच त्यांच्यासाठी पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे व्याख्यानेही आयोजित करावीत असे म्हणाले.
शिक्षणविस्तारअधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी  शिक्षणाची क्षितीजे सर करताना आपल्या मातीची  नाळ कायम ठेवण्याचे आवाहन केले,कोरोणामुळे शिक्षण थांबले नाही हे या निकालातून दिसून आले आहे. राम निकम यांनी या कार्यक्रमाचा आढावा घेतला तर संचालिका सिमाताई निकम यांनी बंकेच्या विविध सभासदाभिमुख योजना बाबत माहिती दिली.  प्रथमेश वराट व अनिल आष्टेकर यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत मांडले. या कार्यक्रमात प्रथमेश वराट,अभिषेक निकम व कल्याणी चावणे यांचाही उच्च शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरजिल्हा बदलीने तालुक्यात हजर झालेल्या तात्या घुमरे, विठ्ठल पवार, विष्णू राठोड, संजय राऊत, प्रकाश राठोड, विजय रायकर, प्रविण शिंदे, अशोक सोनवणे व संदिप ढवळे यांचाही  सत्कार करण्यात आला.
  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना  फेटा, पुस्तक व पेन देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
                                                                         यावेळी वैजिनाथ गीते, नारायण लहाने, शिवाजी हजारे, विकास हजारे, हनुमंत निंबाळकर, अनिल अष्टेकर, जालिंदर राऊत, सदाशिव भालेराव, अनिल कुलकर्णी,राजेन्द मोहळकर, गौतम काळे, भागवत निंबाळकर,राजेन्द हजारे, दिलीप परकड, अमरचंद चिंचकर, दत्तात्रय उदारे, दत्तात्रय आंधळकर, जितेंद्र आव्हाड, सचिन पवार, शिरीष बारटक्के,  विजय रेणुके, राजेन्द्र पुराणे स्मिता डोंगरे, कोकरे मॅडम,चावणे मॅडम, बारवकर मॅडम, मानेकर मॅडम, गुंजेगावकर मॅडम, सोले मॅडम, घाडगे मॅडम, मनीषा वाघ मॅडम, सुनंदा वराट मॅडम,वंदना मोरे मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण लहाने, आभार शिवाजी हजारे यांनी तर सूञसंचलन विजयकुमार रेणुके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here