अभिमानास्पद!! जामखेड तालुक्यातील मल्लाने मारले आशियाई मैदान पै. सुजय तनपुरे ने पटकावले आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

0
405

जामखेड न्युज—–

अभिमानास्पद!! जामखेड तालुक्यातील मल्लाने मारले आशियाई मैदान

पै. सुजय तनपुरे ने पटकावले आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

व्हिएतनाम देशात झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत म्हणजेच 48 देशामध्ये जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा पैलवान सुजय नागनाथ तनपुरे याने भारतासाठी सुवर्णपदक मिळवले आहे.

आतापर्यंत पै. सुजय तनपुरे याने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकावले आहेत. आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्या बद्दल जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पै सुजय तनपुरे च्या यशाबद्दल त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पै. सुजय तनपुरे याने खेलो इंडिया यूथ गेम पटणा बिहार २०२५ मध्ये ७१ किलो बीच रेसलिंग फ्रीस्टाईल  गटात सुवर्ण पटकावले होते.

2023 मध्ये आशियाई कुस्ती 68 kg वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. खेलो इंडिया गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. वडील संजय तनपुरे, हे देखील कुस्तीमध्ये सक्रिय आहेत. सुजयने आशियाई कुस्ती स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे.

सुजय तनपुरे, जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा आहे. 2018-19 मध्ये तो सरावासाठी पुण्यात गेला, कारण त्याच्या गावी पुरेसे भागीदार नव्हते. 15 मे २०२५ रोजी पाटणा येथे झालेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. सुजयने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

सुजय तनपुरे याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. यामुळे जिल्हा आँलंपिक असोसिएशन कडून जुलै 2024 मध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळाला होता. तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली होती.

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. आताही याही वर्षी सुवर्णपदक पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here