Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड मध्ये एका विहिरीत आढळला मृतदेह, एकच खळबळ

जामखेड मध्ये एका विहिरीत आढळला मृतदेह, एकच खळबळ

0
2451

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये एका विहिरीत आढळला मृतदेह, एकच खळबळ

जामखेड शहरातील करमाळा रोडवरील नवीन न्यायालयाकडे जाणार्‍या शेताजवळील विहीरीत आरिफ इसाक शेख वय 39 वर्षे रा. सदाफुले वस्ती, जामखेड या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी यांची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, शुक्रवार दि 13 जुन रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जामखेड येथे करमाळा रोडकडील नवीन न्यायालयाकडे जाणाऱ्या बाजुच्या शंकर भाऊसाहेब कोल्हे शेत गट नं 157 मधिल शेतातील विहीरीमध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

हा मृतदेह शेताच्या मालकास विहिरीत दिसुन आल्यानंतर ही घटना लक्षात आली. विहिरीत पडलेल्या मृतदेहाला बरेच दिवस झाल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. जामखेड पोलीस त्या ठिकाणी आल्यावर इतरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मयताच्या खिशात त्याचे आधार कार्ड आढळून आल्यानंतर त्याची ओळख पटली असून आरिफ इसाक शेख वय 39 वर्षे रा. सदाफुले वस्ती, जामखेड असे त्याचे नाव आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच त्याच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

घटनास्थळी मृतदेह वर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन चे पो.ना. जितेंद्र सरोदे, पो. कॉ. जी. डी काळाने, व पो. कॉ. प्रकाश मांडगे यांनी मदत करुन घटनास्थळी मृतदेहाचा पंचामाना केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. जितेंद्र सरोदे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!