राज्याच्या राजकारणात जामखेड चा दबदबापण जामखेड करांच्या नशीबी चिखल तुडवण्याचीच वेळ
राज्याच्या राजकारणात जामखेड चा मोठा दबदबा आहे. विधानसभेचे सभापती पद प्रा. राम शिंदे यांची महायुतीत मोठी चलती आहे तसेच महाविकास आघाडी मध्ये आमदार रोहित पवार यांचेही मोठे वर्चस्व आहे. तरीही जामखेड शहरातील रस्ता अडिच वर्षापासून रखडलेला आहे. यामुळे रिमझिम पावसात जामखेड करांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्याच्या राजकारणात दबदबा असणारे नेते जामखेड साठी आपले वजन का वापरत नाहीत. याचे कोडेच जामखेड करांना पडले आहे. एका फोन वर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल पण अडीच वर्षे झाले तरी मार्गी लागत नाही याचे आश्चर्य जनतेला आहे.
जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था आहे. शहरातील नागरिकांना अनेक अडचणी चा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पावसाचे, गटाराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे दुर्गधी व साथीचे रोग परिसरात फैलावले जातात. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, हवा तेवढा रस्ता उकरलेला नाही. अर्धवट रस्ता, कुठे गटाराचे काम पूर्ण तर कुठे गटारच नाही. शहरात खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक अनेक दिवसांपासून रस्ता अपुर्ण आहे यातच बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक येथे खडी टाकून ठेवलेली आहे. वाहनाच्या टायरखाली येऊन दगड उडून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर अनेक वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार जामखेड येथे आले असता जाहीर सभेत सांगितले होते की, रस्ता विलंबा बाबत मी लगेच संबंधित अधिकारी यांना सांगतो वेळ पडली तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करतो. या गोष्टीला एक महिना झाला तरी अद्याप काहीही हालचाल नाही रस्ता, अतिक्रमण जैसे थे आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार जामखेड प्रश्नाबाबत हतबल झाले अशीच चर्चा नागरिकांमध्ये आहे.
रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग, खडी व मुरूम यामुळे निर्माण होणारी धुळ यामुळे नागरिक व व्यापारी हैराण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर खाचखळगे यामुळे गाड्या व माणसाचे मनके खिळखिळे तसेच खडीचे दगडावर अनेक गाड्या घसरतात. तसेच मोठे वाहने वेगात ये जा करतात यामुळे दगड उडून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अस्ताव्यस्त लावलेली वाहने यामुळे यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात रुग्णवाहिका ही अडकतात.
मागे काही महिन्यापूर्वी शहरामध्ये प्रशासनाने कारवाई करताना दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. गोरगरीबांना रस्त्यावरून ऊठ तर धनदांडग्यांना दिलेली सूट पाहता संताप व्यक्त केला आहे. या वेळेस लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एक दिलाने काम करून ‘उद्याच्या भविष्यातील जामखेड’ होण्यासाठी सरसकट अतिक्रमण मुक्त जामखेड करावे अपेक्षा सुजन नागरिक करत आहे.लवकरात लवकर अतिक्रमण हटवून सुसज्ज रस्ता बनवावा अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे.
अनेक दिवसांपासून रखडलेला जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक रस्ता सुरू झाला होता. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व्यापारी, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापुर्वी बैठक संपन्न झाली होती यावेळी अतिक्रमणे काढण्यात येणार याबाबत एकमत झाले होते. दोन महिने झाले तरी अतिक्रमण हटाव मोहिम सुरु झाली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
अडिच वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अठरा महिन्याची मुदत असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम झाले नाही. आगोदर विधानसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी गप्प राहिले आता परत नगरपरिषद निवडणूक होणार म्हणून परत लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. एरवी विकास कामाच्या बाबतीत श्रेयवाद उफाळून येतो मीच आणले म्हणून प्रेसनोट येतात. यामुळे वेळेत नियमानुसार रस्ता होण्यासाठी, विधान परिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांनीगप्प दिसत आहेत.