भाजपाच्या जामखेड तालुकाध्यक्ष पदी बापुराव ढवळे तर शहर मंडलाध्यक्ष पदी संजय काशिद यांची निवड

0
393

जामखेड न्युज—–

भाजपाच्या जामखेड तालुकाध्यक्ष पदी बापुराव ढवळे तर शहर मंडलाध्यक्ष पदी संजय काशिद यांची निवड

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी साठी नुकत्याच पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत मुलाखती झाल्या होत्या. यानंतर सविस्तर अहवाल तयार करत आज भाजपाच्या तालुकाध्यक्ष व मंडल शहराध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

जामखेड भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी तसेच पिंपरखेड येथील हॅट्रिक सरपंच बापुराव ढवळे व मंडल शहराध्यक्ष पदी संजय काशिद यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

जामखेड तालुक्यात दोन मंडल आहेत तसेच 143 बुथ आहेत. जामखेड शहर व सात वाड्या मिळून तीस बुथाचे एक मंडळ तर ग्रामीण भागाचे 113 बुथचे एक मंडल आहे. आता तालुकाध्यक्ष संपुर्ण तालुक्याची कार्यकारीणी तयार करतील तर शहर मंडलाध्यक्ष हे शहराची कार्यकारीणी तयार करतील.

तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे

तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे हे सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू आहेत तसेच ते पिंपरखेड ग्रामपंचायत चे सलग तीन वेळा सरपंच राहिलेले आहेत. त्यांच्या निवडीमुळे विविध क्षेत्रातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ते जामखेड शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख म्हणून काम पाहत होते. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे देवेंद्र फडणवीस व प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते सभापती प्रा राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात. रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे असे विविध कार्यक्रम सतत सुरू असतात. त्यांच्या निवडीमुळे शहरातील तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे.

तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे तर मंडल शहराध्यक्ष संजय काशिद यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here