सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात प्रथमच रंगणार डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार!! राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांची संकल्पना
सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात प्रथमच रंगणार डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांची संकल्पना
सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रिमीयर लीग २०२५ पहिल्या पर्वाचे भव्य दिव्य असे दिवसरात्र क्रिकेटचे आयोजन १८ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
पूर्वतयारी म्हणून जामखेड तालुक्यातील मातब्बर आठ संघमालकांकडून तब्बल ८० च्या वर खेळाडूंचा यावेळी IPL च्या धर्तीवर हॉटेल आमराई याठिकाणी लिलाव प्रक्रिया पार पडली.
लिलाव (Auctin) कार्यक्रमात जानकीमामा गायकवाड यांच्या शुभहस्ते महापुरुषांना मानवंदना देण्यात आली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जामखेड नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश दादा निमोणकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ल. ना. होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य अनंता खेत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आठ संघमालकांच्या संघांमध्ये अनुक्रमे १) समता वॉरीयर्स जामखेड . (संघमालक- संतोष गव्हाळे व श्री.रामशेठ निमोणकर)
२) मेजर ११ जायभायवाडी (संघमालक- श्री.अशोक मुंढे , श्री. संदीप ठोंबरे व ॲड. अमोलराजे जगताप)
३) आर्यन वॉरीयर्स जामखेड . (संघमालक- डॉ.सुशील पन्हाळकर व डॉ. आबेद जमादार)
६) मावळा क्रिकेट क्लब संघमालक- सुरजशेठ मुळे व ऋषी विटकर
७) सोनपरी टायटन जामखेड- (संघमालक- संजय डोके व घनशाम राळेभात.)
८) एम.जे. नाईट राईडर्स- संघमालक- श्री. जमीरभाई सय्यद (बारूद).
कार्यक्रमा प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचेविवेकजी कुलकर्णी, नगरसेवक राजेंद्र वाव्हळ, नगरसेवक शामीरभाई सय्यद, मनसे तालुकाप्रमुख प्रदिप टापरे, मनसे नेते हवाशेठ सरनोबत, पोलिस हवालदार अविनाश ढेरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे ,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष महादेव ओंबासे संजय काळे , ADCC बँकेचे गोरे साहेब तसेच जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, अविनाश बोधले, पपूभाई सय्यद, अशोक वीर यांच्यासह अनेक क्रिकेटरसिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या निवेदन विजयकुमार जाधव यांनी केले तर आभार अजय कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मुनाफ शेख, शिवराज वीटकर, सागर आमले, तुषार म्हेत्रे यांनी परीश्रम घेतले.