जामखेड न्युज—–
“मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन, सभापती प्रा राम शिंदे यांची जामखेड मध्ये खास उपस्थिती राहणार
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र भाजपाने भव्य ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवर चर्चा होणार असून महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना मजबूत संघटन उभारण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी सभापती प्रा राम शिंदे यांची जामखेड मध्ये खास उपस्थिती राहणार आहे.
भाजपाने महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्या गाठण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वी पणे पूर्ण केला असून यानिमित्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस या कार्यकर्ता संमेलनात प्रमुख मार्गदर्शन करणार असून कार्यक्रम ६ एप्रिल रोजी दुपारी १.००वाजता ऑनलाईनस्वरूपात पार पडणार आहे. कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम https://www.youtube.com/live/tEtETIkB6yM?feature=shareया लिंकवर लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे.
भाजपाच्या या ऐतिहासिक सदस्य नोंदणी मोहीमेमुळे पक्ष अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकांसाठी भाजपाची ताकद वाढणार आहे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नमूद केले आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांचा दौरा