‘स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड’ असा संदेश जामखेड शहरात वेगवेगळ्या भिंतीवर रंगवून दिलेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर लघुशंका करतात. याची दुर्गंधी परिसरात पसरते. लाखो रूपयांचे स्वच्छतेचे टेंडर निघतात. प्रत्यक्षात कोठेही स्वच्छता करताना दिसत नाहीत फक्त भिंती रंगवून कागदोपत्रीच स्वच्छता अभियान कार्यक्रम दाखवला जातो आणि लाखो रूपयांचा मलिदा हडप केला जातो. याकडे अधिकारी व पदाधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
जामखेड शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, मोकाट कुत्रे, जनावरे व डुक्करांचा मुक्त संचार रस्त्यावर आहे. यामुळे डासांची संख्या वाढली असून डेंग्यू मलेरिया साथीची आजार वाढले आहेत. जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे. बस स्थानक परिसर, तहसील परिसर, ग्रामीण आरोग्य केंद्र, महावितरण परिसर या सह अनेक ठिकाणी उघड्यावर लघुशंका करतात यामुळे महिला व मुलींची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. तसेच अनेक ठिकाणी कचरा आहे.
जामखेड शहर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. अनेक ठिकाणी कचरा, घाणीचे साम्राज्य, अनेक भागात उघड्यावर लघुशंका यामुळे डासांचा प्रादुर्भाव तसेच घाण तसेच महिलांसाठी स्वच्छता गृह नसल्याने कुचंबणा होते तसेच अनेक ठिकाणी उघड्यावर लघुशंका यामुळे शालेय विद्यार्थी व महिलांची कुचंबना होते. तसेच डासांचा प्रादुर्भाव होतो. घाणीमुळे डुक्करांचा मुक्त संचार, मोकाट जनावरे यामुळे जामखेड शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. ही कुत्री अंगावर येत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना शहरातून वावरताना दक्षता घ्यावी लागते. मोटारसायकलस्वारांच्या मागे कुत्री लागत असल्याने मोटारसायकल चालविताना कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कुत्रे, डुकरे यांच्या उपद्रवाबरोबरच घाणीच्या साम्राज्य मुळे डासांचा उपद्रव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिंगल पट्टी तर काही ठिकाणी अर्धवट रस्ते आहेत यामुळे वाहतूक कोंडी होते यातच रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. मोकाट जनावरे ही रस्त्यावर मधोमध बसलेले असतात. एखाद्या नागरिकांने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येतात. कुत्रे तर मोटारसायकल मागे लागल्याने अनेक मोटारसायकल स्वार घसरून पडून जखमी झाले आहेत.
सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी मोकाट जनावरे, डुक्करांचा मुक्त संचार नेहमीचाच झाला आहे. कधी कधी तर पंधरा ते वीस कुत्र्याच्या झुंडी च्या झुंडी रस्त्यावर फिरत आहेत. ही कुत्री बीड रोड, नगर रोड, तपनेश्वर, सदाफुले वस्ती, पेठ, पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वावरत असून, यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास ती अंगावर येत आहेत. या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व लहान बालके यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. कधीही कुत्री अंगावर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्यांचा चावाही या कुत्र्यांनी घेतल्याचे नागरिक सांगतात.
अनेक वेळा मोटारसायकलला कुत्री आडवे आल्यानेअनेक जण पडून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.