आरोग्य विभागाप्रमाणेच पेट्रोलियम क्षेत्रात डॉ झगडे चांगली सेवा देतील – सभापती प्रा राम शिंदे
जामखेडमध्ये मुक्ता पेट्रोलियमचे शानदार उद्घाटन
जामखेड शहरात डॉ. गणेश झगडे यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या आदर्श कामाने ठसा निर्माण केला आहे. आता पेट्रोलियम क्षेत्रात पदार्पण केले आहे. तेथेही आदर्श काम करतील व चांगली सेवा देतील असा विश्वास मुक्ता पेट्रोलियमच्या उद्घाटन कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला.
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जामखेड कर्जत रोडवर मुक्ता पेट्रोलियमचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळीमुक्ता पेट्रोलियमचे संचालक डॉ. गणेश झगडे, प्रा मधुकर राळेभात, विशाल शर्मा उपमहाप्रबंधक संभाजीनगर, बबन (काका) काशिदडॉ. टेकाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, डॉ. भगवान मुरूमकर, हभप परमेश्वर खोसे, आकाश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, अमित चिंतामणी, राहुल बेदमुथ्था, विनायक राऊत, अँड. प्रविण सानप, डॉ. अर्चना झगडे, डॉ. संदीप टेकाडे, डॉ. सोमनाथ टेकाडे, वैजनाथ पाटील, उद्धव हुलगंडे, कांतीलाल वराट, विष्णू भोंडवे, डॉ. ज्ञानेश्वर झगडे, अमित जाधव, तात्याराम पोकळे, दिगंबर चव्हाण,शिवकुमार डोंगरे, हभप योगीराज बापू, तुषार बोथरा, गुलशन अंधारे, हरिभाऊ बेलेकर, मनोज कुलकर्णी, डॉ. गणेश जगताप, सोमनाथ राऊत, विठ्ठल बनकर, शरद जाधव, विठ्ठल जाधव, राम जाधव, अमोल राऊत, सचिन राऊत, अर्णव झगडेयांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा राम शिंदे म्हणाले की, साठ हजार पेक्षा जास्त रूग्णांना आरोग्य सेवा दिलेली आहे. याचे मोल पैशात मोजता येणार नाही. आरोग्य क्षेत्राप्रमाणे आता पेट्रोलियम मध्ये ही आदर्श काम करणार आहेत. डॉ. गणेश झगडे यांनीचांगले धाडस केले आहे, प्रतिसादही चांगला मिळेलकारण त्यांचे काम नियोजन बध्द असते. असे सभापती शिंदे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुक्ता पेट्रोलियमचे संचालक डॉ. गणेश झगडे म्हणाले की, मी संस्कारी कुटुंबातील आहे. त्यामुळे मला सर्वाचा सपोर्ट आहे.पेट्रोलियमचे काम एका वर्षात पुर्ण केले आहे.प्रामाणिकपणे ग्राहकांना चांगल्या दर्जाची सेवा देणार आहोत. ग्राहक समाधानी असतील असेच काम करणार आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम उपमहाप्रबंधक विशाल शर्मा म्हणाले की, संभाजीनगर विभागात हा 450 वा पंप आहे. डॉ झगडे यांनी नवी डिझाइनसह उत्तम प्रकारे काम केले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम मार्फ ग्राहकांना उच्च दर्जा दिला जाणार आहे.
डॉ. भगवानराव मुरूमकर बोलताना म्हणाले की, हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये आता पेट्रोल, डिझेल बरोबर आता सीएनजी व चार्जिंग सुविधा उपलब्ध करावी
प्रा मधुकर राळेभात बोलताना म्हणाले की, चांगली सेवा दिली यामुळे डॉ. झगडे यांची जामखेडशी नाळ जोडली गेली चांगल्या सेवेचा फायदा परिसरातील नागरिक घेतील, चांगली सेवा दिली की चांगले फळही मिळतेच आता पेट्रोलियम क्षेत्रात चांगली सेवा देतील.
कार्यक्रमाचे आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षमहेश निमोणकर यांनी मानले.