बीड येथील कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृताचे नाव धनंजय नागरगोजे असे असून, ते केज तालुक्यातील केळगाव येथील विना अनुदानित आश्रम शाळेत मागील १८ वर्षांपासून कार्यरत होते.
केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार.देवगाव ता.केज हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
सदरील शिक्षक हे गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होते सरकारने २०१९ साली २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र ते अनुदान सुरू झाले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणार्या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी स्वराज्य नगर येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आत्महत्येपूर्वी शिक्षकाने लिहिलेले पत्र
बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्यागकेल्या शिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर आता मी थांबतो त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतूल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजाभाऊ मुरकुटे गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत . कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्याअसतील तर मोठ्या मनानी माफ करावे.