जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
पक्षबांधनी व आगामी ध्येय धोरणे ठरवण्यासाठी, जामखेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि. ३१ जूलै रोजी पक्षाचे पक्ष निरीक्षक रामभाऊ मरगळे यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे राज्य निमंत्रक ॲड. डॉ. अरुण जाधव, नगर (दक्षिण) जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण अशा मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जामखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ वाजता बैठकीत ठकीचे आयोजन केले आहे.
या वेळी तालुका कार्यकारिणीची निवड होणार असून पक्षबांधनीसाठी महत्त्वाची चर्चाही होणार आहे. तरी या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन तालुकाध्यक्ष अतिष पारवे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, जिल्हा संघटक भिमराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष नितीन आहेर यांनी केले आहे.