संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येसंदर्भातील आरोपींना फाशी द्यावी
जामखेड शहरासह तालुक्यात शंभर टक्के बंद
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज जामखेड बंदची हाक देण्यात आली होती यानुसार जामखेड शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला पांठिबा दिला.
संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून जामखेड बंदची हाक देण्यात आलेली होती या बंदाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत आजच्या बंदामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळपासूनच जामखेड मध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शंभर टक्के बंद या ठिकाणी ठेवण्यात आल्याने जामखेड सह तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे फोटो समोर आले त्यांनंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.
संतोष देशमुखांची हत्या कशाप्रकारे झाली याचा सारा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चारशीटमधून समोर आलाय. त्यात हत्येच्या वेळच्या मारेकऱ्यांच्या मोबाईल मधून जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटोही आहेत एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोचा उल्लेख पोलिस तपासात करण्यात आलाय. ते फोटो व्हिडिओ इतके विदारक होते की मन असणारा माणूस काही क्षण सुन्नच पडेल.
समस्त जामखेड करांच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना जामखेड बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले होते.निवेदनावर शिवप्रतिष्ठान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले, मंगेश आजबे, प्रदिप टाफरे, हरीभाऊ आजबे, चंद्रशेखर नरसाळे, राजू गोरे, अशोक फोटफोडे, धीरज पाटील यांच्या सह अनेकांच्या सह्या होत्या.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेड करांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.