जामखेड न्युज – – –
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारण्यांची सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तर शाही सोहळ्याचे आयोजन करून मीराबाईचा सत्कार केला.
मणिपूर राज्य सरकारनं मीराबाईला १ कोटी अन् अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( क्रीडा) या पदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली. इम्फाळ येथे परतताच तिच्या स्वागताला गाड्यांचा मोठाचा मोठा ताफाच होता. पण, एवढं सगळं वैभव मिळूनही मीराबाईचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्याची साक्ष देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. सहा भावंडांतील ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडे ती घेऊन यायची. तिने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांनाही उचलता येत नसे.

तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला भारोत्तोलक बनवावे अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचे होते. त्याचवेळी आठवीच्या पुस्तकात तिने मणिपूरच्याच कुंजुराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिच्या आयुष्याचे ध्येय ठरले.. भारोत्तोलकच व्हायचे!

खडतर परिश्रम करत राज्य, राष्ट्रीय पातळीवर उत्तम चमक दाखवली. आशियाई, राष्ट्रकुल, विश्व अजिंक्यपद अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने सुवर्णपदके जिंकली. पण २०१६ च्या च्या रिओ ऑलिम्पिकमधे तीन प्रयत्नात वजन उचलण्यात अपयशी ठरली.
त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणेही अशक्य झाले. कोविडचं संकट ! लॉकडाऊनमुळे सराव पूर्णपणे बंद! करिअर संपणार की काय, अशी सर्वांना धास्ती वाटू लागली.
केंद्र सरकारने ७१ लाख रुपये खर्च करून तिला सरावासाठी अमेरिकेत पाठविले. तिथल्या प्रशिक्षणाचे चांगले परिणाम लवकरच दिसू लागले. ४९ किलो गटात ‘क्लीन अँड जर्क’ मध्ये ११५ किलो वजन उचलून नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकाविले.
मीराबाईला आई सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांनी पाच वर्षाआधी स्वत:चे दागिने विकून ऑलिम्पिकच्या रिंग्स असलेल्या कानातील बाळ्या दिल्या होत्या. स्पर्धेदरम्यान मीराबाईच्या कानात त्या दिसत होत्या.
मीराबाईला आई सेखोम ओंग्बी तोम्बी लीमा यांनी पाच वर्षाआधी स्वत:चे दागिने विकून ऑलिम्पिकच्या रिंग्स असलेल्या कानातील बाळ्या दिल्या होत्या. स्पर्धेदरम्यान मीराबाईच्या कानात त्या दिसत होत्या.
जवळपास २ वर्ष कुटुंबीयांपासून दूर राहणारी मीरा आज सर्व नातेवाईकांना भेटली…