पै. दादा शेळके यांनी पटकाली मानाची शिवराय केसरी शिवजयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने भव्य कुस्ती मैदान उत्साहात संपन्न

0
1165

जामखेड न्युज——

पै. दादा शेळके यांनी पटकाली मानाची शिवराय केसरी

शिवजयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने भव्य कुस्ती मैदान उत्साहात संपन्न

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शंभुराजे कुस्ती संकुल जामखेड व रोहित पवार मित्र मंडळ जामखेड यांच्या वतीने दि बुधवार दि १९ फेब्रुवारी रोजी जामखेड येथे भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यात पै. आशिष हुड्डा यास आस्मान दाखवत मानाची समजली जाणारी शिवराय केसरी पै. दादा शेळके यांनी पटकावली

               

शंभूराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आजबे व चिराग आजबे यांच्या वतीने भव्य दिव्य अशा कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने पैलवान व कुस्ती शौकीन हजर होते.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुल तर्फे गेल्या सात वर्षापासून शंभूराजे कुस्ती संकुल स्थापनेपासूनच मंगेश आजबे यांच्या वतीने भव्य कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात येते. यावेळी दिल्ली येथील पै. आशिष हुड्डा विरूद्ध पुण्याचा पै. दादा शेळके कुस्तीचा सामना झाला यात दादा शेळके विजयी झाले.

पै. सागर मोहळकर विरुद्ध पै. बंटी शेळके यात सागर मोहळकर विजयी झाला. तर पै.संदीप लटके विरुद्ध पै. भैय्या शेळके यात संदीप लटके विजयी झाला तसेच पै.पृथ्वीराज वणवे विरुद्ध पै. साहिल पाटील यात पृथ्वीराज वनवे विजयी झाला.

अशा अनेक दिग्गज पैलवानांच्या कुस्त्या जामखेडकरांना पाहावयास मिळाल्या
भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शंभुराजे कुस्ती संकुलाचे पै. प्रतीक मुळे विरुद पै. विशाल शिंदे, यांच्या कुस्तीने सुरूवात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली.

पै संजय तनपुरे विरुद्ध पै शुभम मगर, पै विकास तावरे विरुद्ध आखिब शेख, पै सौरभ गाडे विरुद्ध पै पप्पू देशमुख, पै उमेश शिंदे विरुद्ध पै गणेश काळे यांच्यासह जवळपास १०० च्यावर पैलवानाच्या कुस्त्या झाल्या रात्री उशिरा पर्यंत कुस्त्यांची दंगल सुरू होती.

या कार्यक्रमास खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

दि. १९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक मंगेश कन्स्ट्रक्शन ऑफीस ते नागेश विद्यालय मिरवणुक निघाली दुपारी ३.०० वाजता श्री नागेश विद्यालय जामखेड येथे या स्पर्धा पार सुरू झाली.

शंभूराजे कुस्ती संकुलचे संस्थापक मंगेश आजबे व चिराग आजबे व मित्रमंडळी तसेच शंभूराजे कुस्ती संकुल यांच्या वतीने भव्य दिव्य असे नियोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here