रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत सभापती, खासदार, आमदार गप्प का❓

0
1092

जामखेड न्युज——

रखडलेल्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत सभापती, खासदार, आमदार गप्प का❓

 

दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग कामाचे उद्घाटन केले होते. हा रस्ता आम्ही मंजूर करून आणला म्हणून आमदार रोहित पवार व आमदार प्रा राम शिंदे यांच्यात मोठ्या प्रमाणात श्रेयवाद रंगला होता. उद्घाटन होण्याच्या आगोदरच सहा महिने रस्ता सुरू झाला होता. दीड वर्षाची मुदत संपली तरी अद्याप निम्माही रस्ता पुर्ण झालेला नाही. शहरात खर्डा चौक ते बाजार समिती पर्यंत काम अपुर्ण आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सभापती प्रा राम शिंदे, खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार गप्प ❓ असा प्रश्न सर्व सामान्य जनता विचारत आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या चार पदरी काँक्रीट रस्ता मंजूर करून १५० कोटी रुपयांचे काम मंजूर करून आणले असून डिव्हाडर,मध्ये स्टेट लाईट, फुटपाथ असा सुंदर रस्त्या एक वर्षात पूर्ण करून कोणाचेही अतिक्रमण असू द्या काढणारच आहे, मतदान नाही केले तरी चालेल पण जामखेडच्या विकासात आडवा येणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमची असल्याचे तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले होते. गोरगरीब जनतेचे अतिक्रमणे काढली मात्र मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तशीच आहेत. ती कधी निघणार आणि रस्ता कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २३ रोजी केले होते.

अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी होता शहरातील अतिक्रमणे तशीच आहेत. लहान लहान टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढले पण शहरातील मोठ मोठे अतिक्रमण तसेच आहेत कामाची गती खुपच संत गतीने होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. आता तर अनेक दिवसांपासून कामच बंद आहे. याबाबत नुकतेच विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार हे मात्र गप्प का❓ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सध्या खर्डा चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत कसलेही काम झाले नाही. विश्वक्राती चौक ते बैल बाजार प्रवेशद्वारापर्यंत एकच बाजू झालेली आहे. पुढे हाॅटेल रघुनंदन पर्यंत तेथून पुढे सौताडा पर्यंत पुलाचे कामे झालेली आहेत रस्ता खोदून मुरूम टाकलेला आहे रस्त्यावर खाचखळगे व फुफाटा यामुळे वाहनधारकांना व शेजारी नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे सुरू झाले आहेत. रस्ता कधी सुरू होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.

चौकट
गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद आहे म्हणून ठेकेदाराला आठ दिवसांपूर्वीच नोटीस बजावली आहे. जर पंधरा दिवसांत काम सुरू झाले नाही तर ठेकेदारांकडून काम काढून घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येईल.
लोभाजी गटमळ सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here