जामखेड न्युज —–
श्री साकेश्वर ग्रामीण सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ अडसुळ यांचे निधन
साकत सारख्या ग्रामीण भागातून जाऊन अगदी शुन्यातून आपल्या कष्टाने श्री साकेश्वर ग्रामिण विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून अडसुळ बंधूंनी नगर शहरात मोठे शैक्षणिक संकुल उभे केले आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ माणिक अडसुळ वय 51 वर्षे यांचे काल सायंकाळी कॅन्सर या आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार अहिल्यानगर येथील नालेगाव अमरधाम येथे आज सकाळी दहा वाजता होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे साकत, जामखेड, नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांचे मोठे बंधू अनिल अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नगर येथे श्री साकेश्वर ग्रामिण विकास सेवा संस्थेची स्थापना 2005 मध्ये केली होती तेव्हा पासून आजपर्यंत ते संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या इंजिनिअरिंग, एमबीए, पाँलिटिक्निक, बी. एड. फार्मसी, आर्ट्स, सायन्स, काँमर्स, तसेच बीबीए, बीबीए, एलएलबी काॅलेजचे चे संपूर्ण (Administration ) प्रशासन ते पाहत होते.
गेली 2 वर्षापासून ते कॅन्सरशी या आजाराशी
लढत होते. सोमवारी दि. २३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.