जामखेड न्यूज——
जामखेड एसटी आगारात स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी
आज गुरुवार दि. 12 डिसेंबर रोजी एस. टी. आगारात स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात आगार व्यवस्थापक शशिकांत खटावकर, अमित चिंतामणी, अजय काशिद, पवन राळेभात, डॉ. भगवान मुरूमकर, शिवाजी डोंगरे, काशिनाथ ओमासे, महादेव राख, शिवाजी लटपटे उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जामखेड आगारातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली जाते.
गुरुवारी सकाळी जामखेड आगारातील श्रीदत्त मंदिराशेजारी हा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमासाठी एसटी आगारातील सुग्रीव जायभाय, हनुमान आंधळे, रामकिसन जायभाय, बाळासाहेब घाडगे, सुनील काळदाते, प्रकाश गावडे, गणेश चिंचकर, बाळासाहेब घुले, सचिन मासाळ, बाळासाहेब सानप, सोमनाथ गीते, अभिमान बोराटे, योगेश पोकळे ,विठ्ठल जायभाय, अशोक दहिफळे, संतोष सानप, रमेश जायभाय आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी आयोजकांनी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.