शपथविधी पार पडताच भाजपतर्फे जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा

0
1689

जामखेड न्युज——

शपथविधी पार पडताच भाजपतर्फे जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा

महाराष्ट्रात महायुती सरकारचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर भव्य दिव्य शपथविधी सोहळा संपन्न होताच जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात, विजू शेठ गुंदेचा काशिनाथ ओमासे, महारुद्र महारनवर, डॉ विठ्ठल राळेभात, सुनील यादव, विष्णू गंभीरे, प्रवीण बोलभट, दादा महारनवर, डॉ.अल्ताफ शेख,
मच्छिंद्र देवकाते, तुषार बोथरा, विलास मोरे, संतोष कात्रजकर, अमित जाधव, जमीर सय्यद, प्रवीण होळकर, गुड्डू विटकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला. कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्रा. राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज होते कारण राज्यात सरकार आले पण आमदार प्रा राम शिंदे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला “गड आला पण सिंह गेला”  आमदार प्रा. राम शिंदे यांना विधानसभेचे सभापती किंवा मंत्री पद मिळेल असा विश्वास कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यकर्ते यांना आहे. 
राज्यात २०१९ मध्ये तेराव्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात ‘मी पुन्हा येईन’ असा निर्धार व्यक्त केल्यानंतर विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेर हा संकल्प पूर्णत्वाला नेला. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते, अर्थात मुख्यमंत्री म्हणून काल बुधवारी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस आज, तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नांनंतर एकनाथ शिंदे हे आजच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महायुती सरकारचा शपथविधी समारंभ पार पडताच फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. 

 

राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here