श्री संत नंदराम महाराज विद्यालय धामणगांव ता. जामखेड जि. अहिल्यानगर शाळेतील शिक्षक स्वामी शिवानंद सोमेश्वर यांचे दि. ०३/१२/२०२४ रोजी सायंकाळी ७:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
स्वामी शिवानंद सोमेश्वर वय 44 यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यामुळे धामणगाव, जामखेड, गूडसूर ता. उदगीर परिसरात शोककळा पसरली आहे.
स्वामी सरांचा स्वभाव सर्व समावेशक होता सर्वांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असायचे श्री संत नंदराम महाराज विद्यालय धामणगांव ता. जामखेड येथे सुरूवातीपासून गेल्या वीस वर्षांपासून शिक्षक तसेच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. बारा वर्षापुर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांचे बायपास झाले होते. रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला ताबडतोब त्यांना दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता.
अंत्यविधी दि. ०४/१२/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता गूडसूर ता. उदगीर जि. लातूर याठिकाणी होणार आहे.
स्वामी सरांच्या मागे आई वडील, पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.