अटीतटीच्या लढतीत रोहित पवार 1243 मतांनी विजयी

0
1982

जामखेड न्युज——

अटीतटीच्या लढतीत रोहित पवार 1243 मतांनी विजयी

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अत्यंत अटीतटीच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अखेर रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते, तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना १ लाख, २६ हजार ४३३ मते. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते, अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटा ला ६०१ मते मिळाली एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे व्हीव्हीपँट मशीन मधील चिठ्ठ्या मोजणी केली तेव्हा 1243 मतांनी रोहित पवार विजयी घोषित करण्यात आले. आमदार प्रा राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती यामुळे अधिकृत निकालाला उशीर झाला. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले निवडीचे प्रमाणपत्र. 

महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते, महायुतीचे आमदार राम शिंदे यांना १ लाख, २६ हजार ४३३ मते. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते, अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटा ला ६०१ मते मिळाली.

अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते घेतली होती त्यामुळे रोहित पवार यांचा विजय अवघड झाला आमदार प्रा राम शिंदे व रोहित पवार यांचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. शेवटी 1243 मतांनी रोहित पवार यांनी मताधिक्य घेतले पण फेरमतमोजणी ची मागणी झाल्याने बराच वेळ गोंधळ झाला होता. शेवटी रोहित पवार यांना 1243 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

आमदार रोहित पवार यांना 127676 मते तर आमदार प्रा राम शिंदे यांना 126433 मते मिळाली यामुळे रोहित पवार हे 1243 मतांचे मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.

कर्जत जामखेड मध्ये निकालाची मोठी उत्कंठा शिगेला पोहचली होती अनेक टिव्ही पुढे तर एकमेकांना फोन करून विचारणा करत होते. फेरमतमोजणी च्या मागणी मुळे निकालाला उशीर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here