जामखेड न्युज——
नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी ओशन क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची निवड
पाटोदा येथील तीन तर साकतच्या एका खेळाडूची निवड
नाशिक येथे होणाऱ्या अंडर 17 वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी ओशन क्रिकेट अकॅडमी पाटोदा व जामखेड येथील चार खेळाडूंची निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर टँलेन्ट आहे हे सिद्ध झाले आहे.
सुशील तांबे यांनी ओशन क्रिकेट अकॅडमी च्या माध्यमातून पाटोदा व जामखेड येथील क्रिकेट खेळाची आवड असलेल्या मुलांसाठी अकॅडमीच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे एका वर्षातच ग्रामीण भागातील ओशन क्रिकेट अकॅडमीचे चार खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.
ओशन क्रिकेट अकॅडमी बालवयात तरुण पिढीला क्रिकेट शिकवण्याचे कार्य करत आहेत. बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन माध्यमातून जो संघ निवडण्यात आला त्यामध्ये या खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये बीड सहभाग घेतला होता. त्या संघामध्ये तेजस चोले, सुयोग जाधव, शुभम घोडेस्वार व शंतनु दूधवडे यांनी सहभाग घेऊन उत्तम अशी कामगिरी केली होती.
तेजस चोले याने ऑलराऊंडर कामगिरी करताना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला. सुयोग जाधव यांनी बॅटिंगमध्ये चमक दाखवली. शुभम घोडेश्वर यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली शंतनू दुधवडे यांनी चांगली फिल्डिंग करून लक्ष वेधले.
हिच कामगिरी लक्षात घेता टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी त्यांची महाराष्ट्राच्या संघामध्ये 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर होणाऱ्या नाशिक येथील टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या राष्ट्रीय अर्थात नॅशनल स्पर्धेमध्ये निवड केली आहे.
तसे पत्र टेनिस क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशन यांच्याकडून बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांना प्राप्त झाले आहे. सर्व खेळाडूंचे ओशन क्रिकेट अकॅडमी पाटोदा व जामखेड तथा बीड जिल्हा क्रिकेट प्रेमींकडून कौतुक करण्यात येत आहे.