जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर, दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार

0
1359

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर, दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार

 


राष्ट्रवादीतील फुटीनंतर रोहित पवार आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात जामखेडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार रोहित पवार यांचे बॅनर झळकले तर याच वेळी दहिहंडी कार्यक्रमात मै हु डॉन गाण्यावर थिरकले रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून नागेश विद्यालय जामखेड येथे भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यसम्राट आमदार मा श्री रोहित दादा पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते राजेंद्र कोठारी,दत्ताभाऊ वारे, माजी सभापती सूर्यकांत नाना मोरे, माजी सभापती संजय वराट सर,तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, महीला तालुकाध्यक्षा सौ राजश्रीताई मोरे,ओबीसी तालुकाध्यक्ष विश्वनाथ राऊत, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवक कार्याध्यक्ष सागर कोल्हे, माजी शहराध्यक्ष राजू गोरे, कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे,उपाध्यक्ष हनुमंत पाटील, काकासाहेब कोल्हे,, माजी नगराध्यक्ष विकास तात्या राळेभात,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष उमर कुरेशी, महेंद्र राळेभात,अमर चाऊस,सोशल मीडिया उपाध्यक्ष सागर कोल्हे, मनोज भोरे, जुबेर शेख,बिरंगळ साहेब, माजी सरपंच नीलेश पवार,सरपंच सुनिल आबा उबाळे,मगर साहेब, भाऊसाहेब कसरे, अविनाश पठाडे,रावसाहेब जाधव, संदीप गायकवाड,बापू कार्ले, सरपंच बाळासाहेब खैरे, युवा नेते चरण कदम, प्रशांत वारे,दत्ता डीसले, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 

स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले.


कर्जत जामखेड मध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये १ सप्टेंबरला दादा पाटील महाविद्यालयात तर जामखेडमध्ये काल २ सप्टेंबरला नागेश विद्यालयात दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात आमदार रोहित भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या हातात बॅनर होते याच वेळी मै हु डॉन गाण्यावर आमदार रोहित पवार बाळ गोपाळ व कार्यकर्त्यांसह मनसोक्त थिरकले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ही दहीहंडी स्पर्धा कर्जत आणि जामखेडमध्ये झाली कर्जत मध्ये झालेल्या दहीहंडी स्पर्धेला मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची खास उपस्थिती राहणार होती तर जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ऋता दुर्गुळे ह्या उपस्थित होत्या.

कर्जत-जामखेडमध्ये होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले होते. फलटण येथील जय हनुमान पथकाने पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक जिंकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here