जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयातील तिघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
उपेश धनलगडे, ऋषिकेश धनलगडे, गौरव रासणे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

अहमदनगर जिल्हा अँथलेटीक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा प्रवरा पब्लिक स्कुल प्रवरानगर येथे स्पर्धा झाल्या. यात जामखेड महाविद्यालयातील उपेश धनलगडे, ऋषिकेश धनलगडे, गौरव रासणे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

त्या स्पर्धेमध्ये जामखेड महाविद्यालयातील खेळाडूं उपेश धनलगडे यांने गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, ऋषिकेश धनलगडे यांने थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला, गौरव रासणे यांने 10 कि. मी. चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला.

या तिन्ही खेळाडूंची शिवछत्रपती क्रीडा सकुल बालेवाडी पुणे येथे दिनांक 19 ते 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. आण्णा मोहिते हे मार्गदर्शन करीत आहेत.

दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, सर्व संचालक मंडळ व प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले.






