ऑलिम्पिकमध्ये नीरजला रौप्य पदक, तर हॉकी टीम इंडिया कांस्य

0
229

जामखेड न्युज——

ऑलिम्पिकमध्ये नीरजला रौप्य पदक, तर हॉकी टीम इंडिया कांस्य

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील 13 वा दिवस ऐतिहासिक ठरला. हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात हॉकी टीम इंडियाने स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने (9 ऑगस्ट) भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवं आणि पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ऑलिम्पिकमधील विक्रमी थ्रो करत सुवर्ण पदक मिळवलं. अशाप्रकारे भालाफेकीतील पहिले 2 पदकं ही आशियाला मिळाली.


ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत नीरज चोप्रा याने भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं. तर हॉकी टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवलं. पैलवान अमन सहरावतला उपांत्य फेरीत विजय मिळवून भारतासाठी रौप्य पदक निश्चित करण्याची संधी होती. मात्र तो पराभूत झाला. मात्र त्यानंतरही अमनला कांस्य पदकाची संधी आहे. अमनचा शुक्रवारी रात्री 11 वाजता कांस्य पदकासाठी सामना होणार आहे. भारताच्या खात्यात सद्यस्थितीला एकूण 5 पदकं आहेत. त्यामुळे अमनकडून सहाव्या पदकाची आशा आहे.


नीरज चोप्राला सिलव्हर तर अर्शद नदीमला सुवर्ण पदक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला भालाफेकीत रौप्य पदक मिळालं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने सुवर्ण पदक मिळवलं आहे. अर्शद नदीम याने ऑलिम्पिकमधील 16 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक करत सर्वात लांब थ्रो करण्याचा कारनामा केला आणि गोल्ड मेडल मिळवलं. तर गत स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागंल.


भारताचं हॉकीतलं 13 वे ऑलिम्पिक पदक

ऑलिम्पिकमध्ये स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचं हे एकूण 13 वं तर चौथं कांस्य पदक ठरलं आहे. भारताची ही ऑलिम्पिक स्पर्धेत सलग कांस्य पदक जिंकण्याची दुसरी वेळ ठरली आहे. भारताने पॅरिसआधी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. तर त्याआधी 1968 आणि 1972 मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. तसेच भारताने 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकही मिळवलं आहे.


पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथं आणि कांस्य पदक मिळालं आहे. हॉकी टीम इंडियाने स्पेनवर 2-1 ने मात करत पदक मिळवलं आहे. भारतासाठी कॅप्टन हरमनप्रीत सिंह यानेच दोन्ही गोल केले. टीम इंडियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक मिळवलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here