जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
सतीशचा काही महिन्यांपुर्वी अपघात झाला…अपघातात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली… जखम मोठी असल्याने पायात लोखंडी रॉड बसवला…मात्र तरीही जखम भरून आलीच नाही… नगर व पुण्याच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आले मात्र जखम तशीच राहिली…पायात विष तयार झाल्याने पाय निकामी होण्याची भीती वाढली… अशावेळी आ.रोहित मदतीला धावले आणि सतिशच्या आयुष्यात पुन्हा एकदा उमेद निर्माण झाली.
जामखेड येथील सतीश आप्पासाहेब माने (वय ३० वर्षे) या युवकाचा अपघात झाला होता.अपघात जबर असल्याने त्याच्या पायात लोखंडी रॉड बसवण्यात आले होते.कालांतराने जखम बरी होणे अपेक्षित असताना तसे झाले नाही.त्याच्या कुटुंबीयांनी काळजीपोटी नगर व पुणे आदी ठिकाणी जाऊन उपचार केले मात्र उपचार घेऊनही जखम भरून आली नाही. जखम तशीच राहिल्याने पायात विष तयार होऊन पाय निकामी होण्याचा धोका वाढला. पाय कापून काढण्याची भीती वाढली.आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या या कुटुंबापुढे डोंगराएवढे संकट उभे राहिले.सतिशच्या कुटुंबीयांनी आ. रोहित पवारांना संपर्क साधून हकीगत सांगितली. आ.पवारांनी त्यांचे दुःख समजावून घेत उपचारासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.डॉक्टरांनी एक लाख रुपयांपर्यंतचा उपचारखर्च सांगितला होता.आ.रोहित पवारांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत करण्यात आले परंतु त्यात सुधारणा झाली नाही. सतीशच्या प्रकृतीचा आढावा घेऊन आ. रोहित पवारांनी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सतीशला बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (दि.२४ जून) रोजी सतीशवर डॉ.भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची यशस्वी शस्त्रक्रिया केली.सतिशचा पाय कापण्याची वेळ टळली.आता सतीश पुर्णपणे ठणठणीत बरा होऊन पूर्वीप्रमाणेच चालायला लागेल. सतीशला आता आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.आ.पवारांचे आभार मानताना माने कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.
*…म्हणुनच ‘ते’ प्रत्येकाला कुटुंबातील सदस्य वाटतात!*
“अपघातात हातपाय निकामी झालेल्या किंवा इतरही आजारात वैयक्तिक लक्ष घालून आ.रोहित पवारांनी हजारो नागरिकांना जीवनदान देऊन अश्रू पुसले आहेत.जिथे गरज भासेल तिथे स्वतः पाठपुरावा करत ते वैद्यकीय मदत पुरवतात.इतकेच नव्हे तर उपचारानंतरही त्या रुग्णाची आस्थेवाईकपणे विचारपुस करतात.म्हणुनच रोहित पवार हे प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात.”