जामखेड न्युज——
अनेक उच्च पदस्थ विद्यार्थी हीच खरी कामाची पावती – विकास वराट
विकास वराट यांचा आदर्श इतरांनी घ्यावा – पी. एस. पवार
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विकास वराट यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न
राज्यात विविध क्षेत्रात जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. जिद्द, चिकाटी व प्रमाणिक सेवेचे हे खरे फळ आहे आणि हीच खरी कामाची पावती आहे असे विकास वराट यांनी सेवापुर्ती सोहळ्यात आपले मत व्यक्त केले.
पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथील जगदंबा विद्यामंदिर चे आदर्श मुख्याध्यापक विकास वराट हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सोहळा शनिवारी दि. 13 रोजी धनगरजवळका येथील जगदंबा विद्यामंदिर येथे सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव पवार पी. एस तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय नवले, नगराध्यक्ष राजूभैय्या जाधव, विक्रम पोकळे माजी शिक्षणाधिकारी, प्रा. मधुकर राळेभात, सौ. उज्वला जंगले स्थायी सदस्य समिती पुणे, सुरेखा पवार सरपंच धनगरजवळका, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, दत्तात्रय वारे, रामराव काळे, अमित चिंतामणी, पिंटुशेठ जाधव सभापती पाटोदा, प्राचार्य रमेश अडसूळ, युवराज मुरूमकर, प्रा. अरूण वराट, डॉ. अजय वराट, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. निखील वारे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, सुरेश लहाने, पोलीस पाटील महादेव वराट, प्रा. श्रीराम मुरूमकर, ज्ञानेश्वर कोळेकर, विनोद नवले, अभयकुमार पवार, नगरसेवक दिगंबर चव्हाण, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, शरद पारखे, सुरेश काळे, प्राचार्य भगवान मडके, हिराबाई काळे, नवनाथ काळे, हरिश्चंद्र येवले, हनुमंत काळे, रोहिदास गिते, परसराम टेळाळे, अशोक पवार, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, विजय पोकळे, सुरेश काळे, अँण्ड उत्तमराव जाधव, बाळासाहेब पवार, प्राचार्य महादेव पडवले, प्राचार्य हरिभगत सर, प्राचार्य पवार एस. के. सुरेश वराट, प्रा. श्रीराम मुरूमकर, बाळासाहेब वराट, शहाजी येवले, श्रीहरी येवले, राम मोरे, एल. आर. जाधव, पोपट वराट, अतुल दळवी, हनुमंत वराट, शहादेव वराट शेठ, कांतीलाल वराट, महादेव वराट, विठ्ठल वराट, अजित वराट, बिभीषण वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. एस. पवार बोलताना म्हणाले की, वराट सर म्हणजे कोहिनूर हिरा आणि तो आम्हाला मिळाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका येथील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपला वेगळाच ठसा उमटवला, शाळेचा नावलौकिक झाला. वराट सरांचा आदर्श सर्वानी घ्यावा असे सांगितले.
यावेळी अनेक माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ व मित्रमंडळी याचबरोबर जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, वराट सरांच्या सुनबाई स्वाती वराट (जाधव), उज्वला जंगले, ज्ञानेश्वर कोळेकर, कॅप्टन लक्ष्मण भोरे, संभाजी कोल्हे यांच्या सह अनेकांनी आपल्या वराट सरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी विद्यार्थी, वराट सरांचे कुंटुबीय, जगदंबा विद्यामंदिर धनगरजवळका, पारेश्वर विद्यालय पारनेर येथील स्टाफ तसेच मित्र मंडळी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर यांनी तर आभार
मुख्याध्यापक अतुल पवार यांनी मानले