स्थानिक चौकशी वरून भटके विमुक्तांना नागरिकत्वाचे पुरावे मिळणार -समाज कल्याण सह. आयुक्त राधाकिसन देवडे जिल्हा समन्वयक अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या मागणीला यश

0
239

जामखेड न्युज——

स्थानिक चौकशी वरून भटके विमुक्तांना नागरिकत्वाचे पुरावे मिळणार -समाज कल्याण सह. आयुक्त राधाकिसन देवडे

जिल्हा समन्वयक अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या मागणीला यश

 

जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील भटके-वि मुक्त समाजातील ज्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे नाहीत जसे की जात प्रमाणपत्र ,रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड, निवडणूक यादीत नाव यापैकी जो पुरावा या समाजाकडे नाही तो गृह चौकशीवरून कॅम्पद्वारे शासन स्तरावरुन देण्यात यावेत अशी मागणी जिल्हा समन्वयक अँड डॉ अरुण जाधव यांनी केली होती यानंतर सर्वाना स्थानिक चौकशी वरून दाखले देण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण सह. आयुक्त राधाकिसन देवडे यांनी दिली. 


निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली,ग्रामीण विकास केंद्राचे अँड. डॉ. अरुण जाधव व विनोदकुमार लाड समाज कल्याण निरीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील भटके- विमुक्तांना गृह व स्थानिक चौकशीवरून जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधारकार्ड, आयुष्यमान भारत, मतदार यादीत नाव हे 5 नागरिक्तवाचे पुरावे शासन विभाग पाडून कॅम्प द्वारे 31 ऑगस्ट भटके-विमुक्त दिनाचे औचित्य साधून देन्यात येणार आहे.


समाज कल्याणने तसे लेखी पत्र काढले आहे. या पत्रामध्ये नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यातून 13 प्रतिनिधींची समन्वयक म्हणून नियुक्त केली आहे. कोणत्या तालुक्यामध्ये भटके-विमुक्तांची किती लोकसंख्या आहे याची आकडेवारी काढून दुपारनंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री पाटील यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते.


यावेळी जिल्हा समन्वयक म्हणून अँड. डॉ. अरुण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. 31 ऑगस्ट 2024 अखेर नगर जिल्ह्यातील सर्व भटके- मुक्तांना स्थानिक चौकशीवरून नागरिक्तवाचे पुरावे मिळणार आहेत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली हे कॅम्प घेण्यात येणार आहेत.

भटके-वि मुक्त समाजातील ज्यांच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे नाहीत जसे की जात प्रमाणपत्र ,रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड, निवडणूक यादीत नाव यापैकी जो पुरावा या समाजाकडे नाही तो गृह चौकशीवरून कॅम्पद्वारे शासन देणार आहे.

पुढील आठ दिवसानंतर याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तालुका निहाय नेमण्यात आलेल्या समन्वयकाने गाववाईज कार्यकर्त्यांची यादी तयार करून या कॅम्प साठी त्यांना जोडून घ्यायचे आहे, आणि शेकडो वर्षापासून भटके- विमुक्त जे सतत भटकंती करतात ,त्यांना नागरिकत्वाचे पुरावे मिळाल्यास शासनाच्या योजना मिळतील आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळेल याची जाणीव शासनाला झाली असल्याने शासनाने अशा प्रकारच्या कॅम्पची तयारी केलेली आहे.

वाडी,वस्तीवर जाऊन भटके विमुक्तांना भेटून हे अभियान राबवले जाणार आहे अशी माहिती विनोदकुमार लाड समाजकल्याण निरीक्षक यांनी दिली व याची सर्वस्वी जबाबदारी ऍड.डॉ.अरुण जाधव यांच्यावर सोपवली आहे.महाराष्ट्र शासनाने भटके-विमुक्तांच्या उन्नतीसाठी हे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ग्रामीण विकास केंद्र संस्था यांच्यामार्फत भटके-विमुक्तातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की आपण या अभियानाचा लाभ घ्यावा आणि या प्रक्रियेस सहकार्य करावे. या बैठकीसाठी बापूसाहेब ओहोळ, लता सावंत, द्वारका पवार, राजू शिंदे, विजय काळे,तुकाराम पवार,नरशिंग भोसले, डिसेंना पवार, लक्ष्मण मोरे उपस्थित होते, बापूसाहेब ओहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here