प्रभाग दोन मधील सर्व नागरिकांना विश्वासात घेत रस्त्याचा प्रश्न सोडवून नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी स्वखर्चाने केले मुरमीकरण

0
347
जामखेड प्रतिनिधी
     प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नासाठी प्रभागातील सर्व लोकांना विश्वासात घेत सामोपचाराने सोडवून स्वखर्चाने मुरूम टाकुन रस्ता तयार करून दिल्याने परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानात जामखेडला अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रभागातील नागरिकांसह नगरसेवक दिंगाबर चव्हाण हे स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबविताना दिसत आहेत.
           स्वच्छ सर्वेक्षणात कर्जत-जामखेडला अव्वल आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी केलेला निर्धार व नागरिकांसह लोकप्रतिनिधींना केलेले आवाहन याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक दिंगाबर चव्हाण हे रोज सकाळ दुपारी व संध्याकाळी आपल्या प्रभागात स्वच्छता मोहित राबवत आहेत.  नागरिकांना बरोबर घेत स्वच्छता मोहीम राबवत आहेत कोठे गटार तुंबले, कोठे पाणी साचले, कोठे रस्त्यावर पाणी आले तर हातात कधी झाडू कधी टिकाव तर कधी खोरे घेऊन लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आहोरात्र झटत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ भाग घेतला आहे. या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धाराने नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून श्रमदान मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार देखील सहभागी होत आहेत. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक दिंगाबर चव्हाण हे आपल्या प्रभागासाठी स्वच्छतेसाठी व लोकांच्या अडीअडचणी साठी आहोरात्र झटणारा नगरसेवक आहे. लोकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणे, स्वतःचा प्रभाग म्हणजे स्वतःचे घर समजून काम करत आहे.  लहान सहान कामे नगरपरिषद कर्मचारी यांना न बोलवता स्वतः करणे, नित्यनेमाने सकाळ व सायंकाळी प्रभागात फिरून अडीअडचणी जाणून घेणे व आता तर स्वच्छता सर्वेक्षणात नंबर आणण्यासाठी चव्हाण यांनीही कंबर कसली आहे. या कामात त्यांना पवनराजे राळेभात, सुर्यकांत ढवळे, विठ्ठल बापू राळेभात, आत्माराम पवार, वायकर सर, अंबादास भोईटे, बाळू डहाळे, सुशेन कोल्हे, संतोष सानप, अनिल राऊत, संजय सांगळे, अर्जुन दराडे, अशोक चव्हाण, संतोष कदम, डिसले, पेडगावकर, गणेश डोके, वाघमारे सर, गिते सर यांच्या सह अनेक नागरिक स्वच्छता मोहीमेत सहभागी होऊन मदत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here